खरीप हंगामासाठी ओला दुष्काळ जाहीर करून उपाय योजनासह कर्ज माफी द्या – मा. आमदार, कृषीभूषण साहेबराव पाटलांचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्रीसह मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
1 min read

खरीप हंगामासाठी ओला दुष्काळ जाहीर करून उपाय योजनासह कर्ज माफी द्या – मा. आमदार, कृषीभूषण साहेबराव पाटलांचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्रीसह मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

Loading

खरीप हंगामासाठी ओला दुष्काळ जाहीर करून उपाय योजनासह कर्ज माफी द्या

माजी आमदार ,कृषीभूषण साहेबराव पाटलांचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्रीसह मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर तालुका खरीप हंगाम 2024 साठी व दुष्काळ जाहीर करून उपायोजना सह कर्ज माफी द्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकरी हतबल झाला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन दिलासा द्यावा अशी मागणी अमळनेर तालुक्याचे माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे..
पत्रात असे म्हटले आहे की जुन ते सप्टेंबर 2024 अखेर सरासरीपेक्षा अधिक सततचा पाऊस ,अतिवृष्टीमुळे कापसासह सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे खरीप हंगाम 2024 हातातून गेल्यामुळे शेतकरी पुन्हा हताश होऊन दुहेरी संकटात सापडला आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांची शासन प्रति असंतोषाची व नाराजीची भावना दूर करण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी सह तातडीने आर्थिक मदत करून सर्व उपयोजनांची अंमलबजावणी व्हावी या अपेक्षांसह हीच योग्य वेळ आहे.. असे पत्राद्वारे कृषिभूषण मा.आमदार साहेबराव पाटील यांनी मागणी केली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *