प्राणिशास्त्र विभागात अतिथी व्याख्यान संपन्न,
![]()
प्राणिशास्त्र विभागात अतिथी व्याख्यान संपन्न
————————————————
प्रताप महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागात ग्लोबल वार्मिंग आणि अंथरोपोजेनिक डिजास्टर यावर व्याख्यान
प्राणिशास्त्र व राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान यांचा संयुक्त उपक्रम
———————————————-
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागात ग्लोबल वॉर्मिंग अंथरोपोजेनिक डिझास्टर या विषयावर व्याख्यान देण्यासाठी एसेसव्हीपीएस श्रीमती पीबीपी बागल महाविद्यालय, दोंडाईचा येथील प्राचार्य डॉ.प्रकाश लोहार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मूलभूत स्वरूपाच्या मार्गदर्शन केले. प्रस्तुत समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन उपस्थित होते. डॉ.प्रकाश लोहार सरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन आणि ग्लोबल वॉर्मिंग यांच्या संदर्भात सूक्ष्मत्त्वाने मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना या विषयाचे सखोल ज्ञान व विस्तृत माहिती देऊन अवगत केले. विद्यार्थ्यांना पीपीटीच्या माध्यमातून विविध स्वरूपाच्या माहितीचे सादरीकरण डॉ.लोहार यांनी केले.
यावेळी विचार मंचावर प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.आर.सी सरवदे व डॉ.अशोक पाटील उपस्थित होते. डॉ.सरवदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच त्यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. लोहार सरांचे सन्मानचिन्ह, प्रतापीय व पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला प्रस्तुत कार्यक्रमाचे संचालन प्रा.ज्योत्स्ना पाटोळे यांनी केले तर प्रमुख अतिथी व वक्ते यांचा परिचय प्रा. वैशाली पाटील यांनी केले.शेवटी या समारंभाचे आभार प्रदर्शन प्रा.अश्विनी पाटील यांनी केले प्रस्तुत समारंभाच्या यशस्वीतेकरिता प्रा. अतुल सैंदाणे प्रा.स्नेहल शिंदे व प्राणिशास्त्र विभागाचे कर्मचारी श्री संदीप बाबुराव सोनवणे,सीसीएमसी विभागाचे कर्मचारी दिलीप शिरसाठ,पराग पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.प्रस्तुत समारंभ करिअर कौन्सिलिंग सेंटर येथील व्याख्यान हॉल येथे दुपारी 2 ते 4 दरम्यान संपन्न झाले.

