माजी मंत्री दाजीसो. रोहिदासजी पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली
1 min read

माजी मंत्री दाजीसो. रोहिदासजी पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Loading

माजी मंत्री दाजीसो. रोहिदासजी पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.—

मारवड ता.अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित सु. हि.मुंदडे हायस्कूल व श्रीमती.द्रो.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय तसेच कै.नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय या ठिकाणी विशाल खान्देशचे लोक नेते स्व. माजी मंत्री दाजीसो. रोहिदासजी चुडामन पाटील यांचे नुकतेच वृद्धपकाळाने वयाच्या ८७ च्या वर्षी दुःखद निधन झाल्यामुळे, त्यांच्या कार्याचा आणि कर्तुत्वाचा उजाळा देण्यासाठी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. संजय बागुल यांनी दाजीसाहेबांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला,
यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले, सर्व प्राध्यापक, आणि मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *