शिंदखेडा येथील माळी कुटुंबाचा प्रकाश विझला, एक उमदा शेतकरी हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
1 min read

शिंदखेडा येथील माळी कुटुंबाचा प्रकाश विझला, एक उमदा शेतकरी हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Loading

शिंदखेडा येथील माळी कुटुंबाचा प्रकाश विझला,
एक उमदा शेतकरी हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

धुळे प्रतिनिधी
शिंदखेडा येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते सुरेश सुखदेव माळी यांचे लहान बंधू व शिंदखेडा नगरपंचायतीचे नगरसेवक युवराज माळी यांचे बंधू प्रकाश माळी वय 50 याचेअल्पशा आजाराने नाशिक येथील अशोका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले
प्रकाश माळी हे एक उत्तम प्रगतशील शेतकरी होते कांदा उत्पादक कापूस तसेच उत्कृष्ट भाजीपाला लागवडीत उत्तम शेती करून उत्पन्न मिळवणारे ते शिदखेडातील एक प्रगतशील शेतकरी म्हणून ते तालुक्यात परिचित होते अतिशय बागायतदार शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या प्रकाश अतिशय मेहनती व काबाळ कष्ट करणारा तरुण शेतकरी अशिक्षीत असला तरी आपल्या मुलांना आपल्यासारखे अत्यल्प कमी शिक्षण न राहता इंजिनिअर डिग्री डिप्लोमा मुलं व मुलींना उत्तम शिक्षण देऊन घडविले घरात वडिलोपार्जित बागायत शेती शेतीत नवनवीन प्रयोग करून अतिशय भरघोस उत्पन्न घेऊन आपल्या शेतात विविध प्रकारचे पीक घेऊन शास्त्रीय पद्धतीने उत्पन्न काढणारा सर्वांशी हास्य विनोदाने सगळ्यांचे मन जिंकणारा सुखदुःखात धावून जाणारा प्रकाश गावात व समाजात एक उत्तम उमदा शेतकरी म्हणून परिचित होता संपूर्ण कुटुंबात आबादी आनंद असताना संसाराच्या गाळा अतिशय चांगल्या मार्गाने चालत असताना अचानक प्रकाश ची तब्येत बिघडली शिंदखेडा धुळे व नाशिक अवघ्या तीन दिवसात उपचार घेतले मात्र नाशिक येथील अशोका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना काल दिनांक 27 सप्टेंबर दुपारी दोन वाजता माळी कुटुंबातील प्रकाशच्या सुखी संसारात काळाने झडप घातली व माळी कुटुंबातून या सोज्वळ व्यक्तिमत्वाला प्रकाशला हिरावून नेले या दुःखाची वार्ता संपूर्ण शिंदखेडा शहरात पसरल्याने सावत्र हळूहळू व्यक्त करण्यात आले ते भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांचे मामा होते त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली तीन भाऊ एक बहीण आई असा परिवार होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *