पुणे येथे कॉलेज मध्ये अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अत्याचारावर शासन गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करेल-डाँ. नीलमताई गोऱ्हे.
1 min read

पुणे येथे कॉलेज मध्ये अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अत्याचारावर शासन गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करेल-डाँ. नीलमताई गोऱ्हे.

Loading

पुणे येथे कॉलेज मध्ये अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अत्याचारावर शासन गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करेल-डाँ. नीलमताई गोऱ्हे.

पुणे प्रतिनिधी(उय नरे)
पुण्यात महाविद्यालयीन कँम्पस मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही अल्पवयीन मुलगी असल्यामुळे पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. मुलींच्या सुरक्षिततेचे बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण मुळामध्ये एखादी व्यक्ती मुलींचा गैरफायदा घेतात किंवा त्रास देतात काय ? याच्याबद्दलची चौकशी करून शासन अत्यंत कठोर व कायदेशीर भूमिका घेऊन कारवाई करणार असल्याचे मत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ नीलमताई गोऱ्हे यांनी सांगितले.

अल्पवयीन मुलीवर अन्याय, अत्याचार झाला होता. ती मुलगी सुरुवातीला तक्रार देण्याच्या संदर्भामध्ये पुढे आली नव्हती. परंतु या घटनेची माहिती झाल्यावर पोलिसांनी ही घटना नोंदवून त्यामध्ये आरोपींना अटक देखील केली आहे. डिजिटल स्वरूपाचा पुरावा या घटनेमध्ये समोर आला आहे. त्याच्यामध्ये तिचे फोटो काढण्यात आले आहेत. तिची माहिती व्हायरल करून त्रास दिला जात होता. हे सगळं पुढे तपासामध्ये दिसून येईल. पुणे पोलीस स्टेशनचे अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. पण असं असून सुद्धा काही वेळेला माहिती नीट न गेल्यामुळे लोकांच्या मध्ये गैरसमज होत आहे. तर मला खात्री वाटते की या घटनेमध्ये जे काही योग्य ते पावले उचलली गेली पाहिजेत ती पोलिसांनी उचललेली आहेत. तसेच शासन गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करेल असे मत विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ नीलमताई गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *