प्रताप महाविद्यालयात “आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित संशोधनात भविष्यातील संधी” या विषयावर व्याख्यान संपन्न.
1 min read

प्रताप महाविद्यालयात “आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित संशोधनात भविष्यातील संधी” या विषयावर व्याख्यान संपन्न.

Loading

प्रताप महाविद्यालयात “आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित संशोधनात भविष्यातील संधी” या विषयावर व्याख्यान संपन्न.

अमळनेर: संगणकशास्त्र विभाग प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने “आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित संशोधनात भविष्यातील संधी” या विषयावर एक दिवसीय अतिथी व्याख्यान दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते सदर व्याख्यानासाठी, यु आय टी, आर्क्टिक युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्वे येथील प्राध्यापक डॉ. रवींद्र राजाराम पाटील हे अतिथी व्याख्याता म्हणून उपस्थित होते. अतिथींचे स्वागत संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका पुष्पा पाटील यांनी केले प्राध्यापक अमित शिंदे यांनी अतिथींचा परिचय करून दिला. प्रस्तुत व्याख्यानात डॉ. रवींद्र पाटील यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तसेच त्यासंबधी संशोधनातील विविध संधी तसेच औद्योगिक विश्वातील संधी याबाबत मौलिक मार्गदर्शन केले. सध्या युरोपातील उपलब्ध संधी व त्यासाठी कसा उपलब्ध निधी होऊ शकतो ह्यावर विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधले. सदर कार्यक्रमासाठी बी. एस्सी, एम. एस्सी तसेच बी. सी. ए. चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, डॉ. धीरज वैष्णव, डॉ. मुकेश भोळे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. बाविस्कर यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. पुष्पा पाटील व त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *