प्रताप मध्ये अँप्लिकेशन ऑफ मॅथेमॅटिक्स या विषयावर व्याख्यान संपन्न
![]()
प्रताप मध्ये अँप्लिकेशन ऑफ मॅथेमॅटिक्स या विषयावर व्याख्यान संपन्न
————————————————
●गणित विभाग व रुसाच्या संयुक्त
विद्यमाने उपक्रम
● व्याख्यानात १३० जणांचा सहभाग. ●उपप्राचार्य डॉ.अमित पाटील यांच्या
हस्ते उपक्रमाचे उदघाटन.
————————————————-
अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप कॉलेज (स्वायत्त) , गणित विभागातर्फे अँप्लिकेशन ऑफ मॅथेमॅटिक्स वर गेस्ट लेक्चर संपन्न झाले .या प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य डॉ.अमित पाटील यांनी अभ्यासक्रमाला बांधिलकी राहू नका त्यातले योग्य मर्म ओळखा.
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात ते आपणास नीटपणे ओळखता आले पाहिजे .
गणित,पदार्थ विज्ञान, रसायनशास्र ,वनस्पतीशास्त्र हे पायाभूत विज्ञान आहे , प्रस्तुत कार्यक्रमात प्रा. डॉ. चंद्रशेखर सुतार (पीएसजी व्हीपी मंडळ आर्टस् सायन्स कॉलेज शाहदा) यांनी *अँप्लिकेशन ऑफ मॅथेमॅटिक्स* या विषयावर *गणित हे मूळ विज्ञान शाखा आहे* तसेच नौकरी संदर्भात जगातील आवश्यक विषय म्हणजे गणित होय. या विषयाची गरज आपणास आयुष्यात दररोज सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत लागतो.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.अरुण जैन, डॉ.धिरज वैष्णव , डॉ.अमित पाटील , डॉ.मुकेश भोळे (समन्वयक, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान,रुसा)डॉ.मुकेश भोळे यांचे प्रोत्साहन लाभले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख डॉ.नलिनी पाटील यांनी केले. समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.रोहन गायकवाड यांनी केले तर आभार
डॉ.वंदना भामरे यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी प्रा.प्रियंका पाटील ,प्रा.प्रेरणा सोनवणे व
प्रा.इरफान कुरेशी यांचे विशेष सहकार्य लाभले .

