डिजिटल उपकरणांपासून मुलांना वाचवा-डी ए धनगर यांची आर्त हाक
![]()
डिजिटल उपकरणांपासून मुलांना वाचवा-डी ए धनगर यांची आर्त हाक
मुलांची शैक्षणिक एकाग्रता वाढवण्यासाठी डिजिटल डिव्हाइस वापर बंद करावे
अमळनेर प्रतिनिधी
सध्या पौगंडावस्थेतील मुलांना डिजिटल उपकरणांच्या वापराची सवय झाली आहे. परंतु डिजिटल डिवाइस अतिप्रमाणात वापरल्यामुळे मुलांची एकाग्रता आणि शिकण्याच्या क्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडताना दिसत आहे. तसेच दृष्टीदोष आला सामोरे जात आहेत. त्यामुळे शाळेमध्ये पहिली पासून डिजिटल उपकरणे वापरावर निर्बंध घातला पाहिजे अशी मागणी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्या कडे साने गुरुजी विद्यालयाचे शिक्षक डी. ए. धनगर यांनी केली आहे.
सध्या शाळांमध्ये डिजिटल उपकरणांचा वापर वाढला आहे. त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक कामगिरीत घसरण झाल्याचे बाब लक्षात येते. मुले डिजिटल उपकरणांसोबत शिक्षण घेताना गेम खेळता यावा यासाठी अथवा सोशल मीडिया वापरण्यासाठी अभ्यास लवकर संपवतात. बऱ्याच मुलांचा स्क्रीन टाईम खूपच वाढला आहे. दिवसभरातील जास्तीचा वेळ डिवाइस वापरण्यात जातो त्यामुळे मुले सध्या स्क्रीनवर बराच वेळ घालवतात. समाजात मुलांच्या दृष्टीदोषाची समस्या भेडसावत आहे. शाळा एक अशी जागा असावी जिथे स्क्रीन पासून दिलासा मिळू शकेल व मुलांचे लक्ष विचलित होणार नाही व कोणत्याही कामावर दीर्घकाळ लक्ष टिकून राहू शकते. स्क्रीन टाईम वाढल्यामुळे मुलांची एकाग्रता कमी होऊन शैक्षणिक गुणवत्ता कामगिरी कमी होते त्यामुळे त्यावर बंदी आणली पाहिजे अथवा मर्यादित वापर करायला भाग पाडले पाहिजे. किशोरवयीन मुलांचा स्क्रीन टाईम जास्त झाल्यास मुलांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे त्यावर त्वरित बंदी आणावी अशी मागणी होत आहे. अलीकडच्या स्पर्धेच्या वातावरणात टिकण्यासाठी मुलांचा तंत्रज्ञान वापरावर भर आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक थकवा येतो त्यामुळे कामगिरीवर परिणाम होतो. भविष्यात डिजिटल संकट मुलांवर ओढवू नये यासाठी आत्ताच दक्षता घेणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानातील स्पर्धेत मुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य व न्यूनगंड तयार होऊन मानसिक खच्चीकरण होते त्यापासून बचाव केला पाहिजे. किमान इयत्ता दहावी पर्यंत तरी शाळा शाळांमध्ये डिजिटल डिवाइस बंद करावे. विद्यार्थ्यांवर येणारी आपत्ती दूर करावी. भविष्याबद्दल सकारात्मकता निर्माण करून मानसिक आरोग्य टिकवून ठेवणे काळाची गरज ठरली आहे.

