समतेचा जयघोष करत मंगळवारी 24 सप्टेंबरला निघणार ‘सत्यशोधक दिंडी
![]()
समतेचा जयघोष करत मंगळवारी 24 सप्टेंबरला निघणार ‘सत्यशोधक दिंडी
============================
छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला १५१ वर्षे पूर्ण होत असल्याने सत्यशोधक समाजच्या वतीने २४ सप्टेंबरला ‘सत्यशोधक दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना महत्व देत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुरोगामी विचारांचा जागर करून मुला-मुलींना शिक्षणाचे अमृत दिले. चूल आणि मूल संकल्पनेतून बाहेर काढत स्त्रियांना स्वतंत्र आणि सक्षमतेचा मार्ग दाखविला. त्यांनी २४ सप्टेंबरला १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस आता १५१ वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्ताने २४ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता क्रांती चौक येथून समतेचा जयघोष करत सत्यशोधक दिंडीस प्रारंभ होईल. पैठणगेट मार्गे गुलमंडी कॉर्नर वरून औरंगपुरा येथील महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापर्यंत गेल्यानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात येणार आहे. *मिरवणुकीत महापुरूषांचे पोशाख परिधान करून विद्यार्थी सहभागी होणार आहे*.
यात सहभागी होण्याचे आवाहन भाऊसाहेब जाधव, संगीता खोबरे, बाबासाहेब राऊत, मिर्झा अब्दुल कयूम, राजेंद्र पुराणे, जनार्दन कापुरे, गणेश हिवाळे, धनंजय मुन्ना बोर्डे, डॉ. नवनाथ गोरे, डॉ. अनिल धुळे, जयप्रकाश शित्रे, जयंत गाजरे, अरविंद के., अॅड. अभय टाकसाळ, विष्णू वखरे, साळूबा पांडव, अनिल चौधरी, विजय महाजन, कल्याण रंधे, सुभाष गांगुर्डे, संध्या जाधव, नितीन जाधव, योगेश गोरे, डॉक्टर उमेश उबाळे, यांनी केले आहे.
—-
विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन
ज्योतिबा फुले हे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक स्तरावर दीन दुबळ्यांसाठी झटले. त्यांनी त्यांचे आयुष्य पणाला लावत शोषितांवर होणाऱ्या अन्यायाविरूध्द आवाज उठविला. जातीभेद, लिंगभेद, धार्मिक कर्मकांड आणि अंधश्रध्देविरोधात आवाज उठवला. सत्याची कास धरून त्यांनी केलेल्या कार्याचा गजर आजही लोक करत आहेत. *महात्मा फुले यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे


