आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्या मार्फत पोषण आहार सप्ताह साजरा
1 min read

आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्या मार्फत पोषण आहार सप्ताह साजरा

Loading

आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्या मार्फत
पोषण आहार सप्ताह साजरा

अमळनेर प्रतिनिधी
आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्यामार्फत रूपजी नगर अमळनेर येथे अंगणवाडी सोबत पोषण आहार सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला.
मुलांना सकस पोषण आहार संतुलित समृद्ध कडधान्य ,पालेभाज्या ,फळांचे महत्व ,व आहारातील विविध जीवनसत्व ,याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका कल्पना रामदास सपकाळे आधार संस्थेच्या आधार आरोग्य प्रोजेक्ट मॅनेजर दिप्ती गायकवाड व आरोग्य मित्र हर्षाली पवार आणि पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय येथील द्वितीय वर्ष विद्यार्थिनी मोहिनी धनगर, बालगोपाल मंडळी आदी उपस्थित होते अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *