लेण्याद्री व ओझर गणपती देवस्थाने प्रगतीपथावर , राहिलेल्या कामांसाठी उपसभापती डाँ. नीलम गोऱ्हे शासनाशी संवाद साघणार !
![]()
लेण्याद्री व ओझर गणपती देवस्थाने प्रगतीपथावर , राहिलेल्या कामांसाठी
उपसभापती डाँ. नीलम गोऱ्हे शासनाशी संवाद साघणार !
पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे )
दिनांक १५:- अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत.महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ नीलमताई गोऱ्हे यांनी अष्टविनायक गणपती मधील लेण्याद्री आणि ओझर येथील गणरायाचे आज दि १५ रोजी दर्शन घेऊन मंदिरातील विश्वस्तांशी संवाद साधला.
दोन्ही मंदिरांच्या विश्वस्तांनी डॉ गोऱ्हे आणि त्यांच्या भगिनी श्रीमती जेहलम ताई जोशी यांचा महावस्त्र व श्रींची प्रतिमा देऊन सत्कार केला.

लेण्याद्री येथे देवस्थानकरता पाणीपुरवठा, शौचालय, रेलिंग ची व्यवस्था इत्यादी सुविधासंदर्भात अडचणी विश्वस्तांनी मांडल्या. पुरातत्व विभागाच्या मर्यादामुळे गावच्या विकासामध्ये येणाऱ्या अडचणी स्थानिक पदाधिकारी यांनी मांडल्या. यावेळी मंदिर व परिसराचा सर्वांगीण विकास साधण्याकरता पुरातत्व विभागाशी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल.तसेच आदिवासी ठाकर समाजाकरिता रोजगार उपलब्ध होण्याकरिता रोजगार हमी योजना व इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजेत असे मत व्यक्त केले. मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ग्रामस्थांनी केलेल्या सुचना व कैफियत पोहचवून देवस्थानचे पावित्र्य राखून लेण्याद्रीचा कायापालट करण्यासाठी उपाययोजना आखल्या जातील, असे आश्वासन डॉ गोऱ्हे यांनी ग्रामस्थांना दिले. आदिवासी ठाकर समाजाच्या वतीने डॉ गोऱ्हे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त शंकर श्रध्दामाने, गोळेगाव सरपंच उपसरपंच हर्षल जाधव, श्री विकास राऊत,सरपंच सीतेवाडी,विश्वस्त मंडळ व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थीत होते.
ओझर येथील श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट श्रीक्षेत्र ओझर येथील गणरायाचे दर्शन घेतले व आरती केली.
यावेळी ओझर देवस्थान विश्वस्त मंडळाकडून करण्यात येणार्या कामांची माहिती घेतली. देवस्थानचे माजी अध्यक्ष गणेश कवडे यांनी उपसभापती यांनी केलेल्या पाठपुरावामुळे मंदिरासाठी दिलेल्या मदतीमुळे मंदिर परिसराचा कायापालट झाला व भक्तांसाठी विविध सुविधा व निवास व्यवस्था उपलब्ध झाल्याची माहिती दिली. यावेळी ओझर येथील तलाव सुशोभीकरणासाठी व विकास कामासाठी निधीतून एकवीस लाखांची मदत देण्याची घोषणा डॉ गोऱ्हे यांनी केली. या प्रसंगी गणेश कवडे संस्थान अध्यक्ष, विश्वस्त सुर्यकांत रवाळे, समीर मांडे, सरपंच तारामती कर्डक, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप कवडे व ग्रामस्थ तसेच ओझरचे मंडल अधिकारी राजेंद्र अडसरे उपस्थीत होते.
अष्टविनायकच्या या यात्रेत डॉ नीलम गोऱ्हे यांच्या सोबत भगिनी जेहलम जोशी, शिरुर मतदार संघ शिवसेना संपर्क प्रमुख सारिका पवार, मावळ जिल्हा प्रमुख शैला पाचपुते, खेड भोसरी जिल्हा प्रमुख मनिषा पारंडे व असंख्य शिवसैनिक उपस्थीत होते.

