सामाजिक उत्तरदायित्व हेच सामाजिक विकासाचे लक्षण -डॉ. मिलिंद बागुल
1 min read

सामाजिक उत्तरदायित्व हेच सामाजिक विकासाचे लक्षण -डॉ. मिलिंद बागुल

Loading

सामाजिक उत्तरदायित्व हेच सामाजिक विकासाचे लक्षण .
डॉ. मिलिंद बागुल

सामाजिक भान जपणारी माणसं ही आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत समाजाला आणि देशालाही दिशा देण्याचे काम करीत असतात, समाजातल्या अनेक घटकांना सोबत घेत सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपणाऱ्या माणसांना निश्चितपणे आंतरिक ऊर्मी आणि जीवनाचा दृष्टिकोन असल्यामुळेच सामाजिक उत्तरदायित्व हेच सामाजिक विकासाचे लक्षण असते असे मत सार्वजनिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी चामुंडा माता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व पी. इ. तात्या पाटील रुग्णालय यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना मोफत चष्म्याचे वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पी. इ. तात्या पाटील होते यावेळी सचिव राहुल पाटील, प्राचार्य डॉ. समीर साखळी कर, नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी रजिस्ट्रार एस. एस. पाटील, डॉ. जयेश वाल्हे, डॉ. अस्मिता श्रीवास्तव, डॉ. संदीप पाटील, सौ एच. ए. सोळंके, सौ एस. डी. महाजन, जी. के. बारेला व कॉलेजचे प्राध्यापक, सर्व विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पी. इ. तात्या पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार डॉ. जयेश वाल्हे सर यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *