जिद्द व चिकाटीच्या जोरावर देवेंद्र ची लघुवाद न्यायलय मुंबई  येथे शिपाई पदी निवड, देवगांव देवळी हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा शिक्षकांनी केला सत्कार…
1 min read

जिद्द व चिकाटीच्या जोरावर देवेंद्र ची लघुवाद न्यायलय मुंबई येथे शिपाई पदी निवड, देवगांव देवळी हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा शिक्षकांनी केला सत्कार…

Loading

जिद्द व चिकाटीच्या जोरावर देवेंद्र ची लघुवाद न्यायलय मुंबईला  शिपाई पदी निवड..

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा शिक्षकांनी केला सत्कार…

अमळनेर प्रतिनिधी- जिद्द आत्मविश्वास चिकाटी हे तीन गुण असले तर विद्यार्थी आपण पाहिलेल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.. देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मधील माजी विद्यार्थी आजतागायत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नावलौकिक करून यशस्वी झाले आहेत..

 

देवगाव देवळी गावात माजी विद्यार्थ्यांनींनी ‘संघर्ष अभ्यासिका’ वर्ग सुरू करून आपल्या भविष्याच्या स्वप्नासाठी स्वतःला झोकून दिले आहे..
देवगाव तालुका अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलला 24 वर्षे झाली.. यात शाळेतील माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, शाळेचा व गावाचा नावलौकिक केला आहे.. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी झालेले विद्यार्थी आताचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरत आहेत हे तेवढेच सत्य आहे.. देवगाव देवळी येथील विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त फावल्या वेळामध्ये तालुक्याच्या ठिकाणी रोजगाराच्या संधी शोधत असतात, आपल्या कुटुंबाचा व्यवस्थित उदरनिर्वाह चालावा व आई वडिलांना एक सपोर्ट व्हावा यासाठी ते नेहमी धडपड करत असतात…

 

देवगांव देवळी ता.अमळनेर येथील भिला रामचंद्र पाटील यांचा मुलगा महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव ता.अमळनेरचा माजी विद्यार्थी देवेंद्र (नानु) भिला पाटील या विद्यार्थ्याने भाजीपाला व्यतिरिक्त जे काम मिळेल ते काम इमाने इतबारे केले.. जिद्द आत्मविश्वास असल्याने परीक्षा देत राहिला.. अखेर त्याला यश मिळाले..
अखेर मुंबई लघुवाद न्यायलयात शिपाई पदी निवड झाली त्याबद्दल त्याचे मनस्वी अभिनंदन व सत्कार महात्मा फुले हायस्कूलमध्ये झाला.. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर.महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के व शिक्षकेतर कर्मचारी संभाजीराव पाटील यांनी सत्कार करीत भावीवाटचीलीस शुभेच्छा दिल्या..

चौकट
आमच्या महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे माजी विद्यार्थी जेव्हा एखाद्या परीक्षेमध्ये यश संपादन करतात.. त्यांची परीक्षेच्या माध्यमातून निवड होते.. नोकरीला लागतात..तेव्हा आम्हाला खूप मोठा आनंद होतो. अशा यशस्वी विद्यार्थ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी व प्रेरणा मिळावी म्हणून सत्कार करण्याचे आम्हाला भाग्य लाभते..
श्री अनिल महाजन
मुख्याध्यापक
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव त. अमळनेर जि.जळगांव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *