महात्मा फुले कॉलनीतील गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा संपन्न
1 min read

महात्मा फुले कॉलनीतील गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

Loading

महात्मा फुले कॉलनीतील गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील पिंपळे रोड भागात महात्मा फुले कॉलनीतील गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बालगोपालांपासून प्रौढमंडळींनी देखील भाग घेतला.
विविध स्पर्धांमध्ये रांगोळी स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा, संगीत खुर्ची, गीत गायन, तसेच हंडी फोडणे, प्लेट थ्रो, बॉल थ्रो अशा विविध स्पर्धांनी उत्सवाचे औचित्य वाढवून आनंदाची भर घातली.

या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले कॉलनीतील सर्व सहकाऱ्यांनी केले होते विशेष करून सुरेश महाजन, प्रवीण कोळी, समाधान पाटील, अनिल वानखेडे, आत्माराम चौधरी , जेष्ठ साहित्यिक अरविंद सोनटक्के यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंडळीने सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *