कला शिक्षकाचा एक अनोखा उपक्रम.
![]()
कला शिक्षकाचा एक अनोखा उपक्रम.
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
शिक्षक हा कलागुणांनी संपन्न असतो. यात कला शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देणारा गुरू. मुंबईतील बोरीवली येथील
हिमालया हायस्कूल या शाळेतील कलाशिक्षक श्री मनोहर बाविस्कर यांनी टाकाऊतून टिकाऊ एक अनोखा उपक्रम सादर केला. नारळाला कल्पवृक्ष असे म्हणतात. नारळ म्हणजे श्रीफळ.
आपल्या हिंदू धर्मात नारळाला फार महत्व आहे. नारळ या नारळातील कोरीव काम केलेले श्री गणेशाची मूर्ती व सुकलेल्या नारळामध्ये अष्टविनायकाचे दर्शन घडविले आहे.

