जनता जनार्दन हाच आपला पक्ष- अपक्ष मा.आ. शिरीषदादा चौधरी यांची माहिती
1 min read

जनता जनार्दन हाच आपला पक्ष- अपक्ष मा.आ. शिरीषदादा चौधरी यांची माहिती

Loading

जनता जनार्दन हाच आपला पक्ष- अपक्ष मा.आ. शिरीषदादा चौधरी यांची माहिती

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जनता जनार्दनाचे आशीर्वाद हेच माझे बळ व ताकद असून त्याच ताकदीच्या जोरावर मी अपक्षच उमेदवारी करणार आहे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, युवकांचा वाढता प्रतीसाद लक्षात घेता विरोधक मन विचलित करण्याचे काम मतदार संघात करत आहेत. विरोधकांना मतदार राजाकडे जाण्यासाठी ठोस असा मुहा नाही. गणेशउत्सवाच्या माध्यमातून ज्या वेळेस मतदार संघात जातो त्या वेळेस महाराष्ट्र राज्याचे मंत्री स्थानिक आमदार यांचा विरोध प्रचंड असंतोष व राग चीड असून सध्या विरोधकांकडे माझ्या विषयी काहीच मुद्दा नसून मतदार राजाचे मन विचलित कसे होईल यातील हा फुसका फटाका आहे. मागील काही दिवसांपूर्वी शिरीषदादा उभे राहणार नाहीत अशी अफवा पसरविण्याचे काम केले असता ३ जुलै रोजी शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराच्या पदाधीकार्यांच्या साक्षीने मी माझी उमेदवारी अपक्ष जाहीर केली व पदाधिकारी देखील जोमाणे कामाला लागले, मध्यंतरी विधानपरिषद वर घेता आहेत असे सांगितले गेले मला विधानपरिषदेवर मागील दाराने जायचे होते तर मी अमळनेर विधानसभा मतदार संघात का आलो असतो मी आखाड्याचा पैलवान आहे, मला कुस्ती खेळायची पहिल्या पासुन मजा येते, मला व माझ्या परिवाराला जनतेची सेवा करायला पहिल्या पासुन आवडते.. मला माझे वडील व मोठे बंधू यांनी लहान पणापासूनच समाज करणाचे बाळ कडू दिले आहेत. हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. उठ सूठ काहीतरी वावड्या बंद करावे. विकास कामाकडे लक्ष द्यावे माझ्या विषयी अफवा उठवण्यात वेळ घालवण्यापेक्षा तालुक्‍यातील वाढत जाणारे प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष देऊन विकासाचे काम तालुक्‍यातील ज्वलंत प्रश्न निम्न तापी पाडळसरे धरण, पिक विमा, ओलादुष्काळ, पुनर्वसीत गावाचा प्रश्न याकडे लक्ष देऊन विकास साधा वेल थोडा आहे. आज राष्ट्रवादीची तुतारी घेता अशी बातमी पसरवली जे बिचारे अपक्षेने पक्षाचे काम करत आहेत. त्यांना भेटू द्या त्यांनी काय झेंडेच बांधायचे का ? आपण आपल्या पक्षाचा विचार करा आता जिल्ह्यातील पदाधिकारी राजीनामा देऊन पक्ष सोडत आहे. अजून थोड थांबा जवळचे पण सोडतील आगे आगे देखो होतो है क्या तरी या पुढे अश्या वावड्या उठवू नये फुसके बार फोडू नका. पुनश्य सांगतो शेतकरी, कष्टकरी, युवकांच्या जोरावर वयोवृद्धांच्या आशीर्वादाने मी अपक्षच उमेदवारी करणार. विरोधकांकडून पसरवणाऱ्या अफवांवर पदाधिकारी, कार्येकर्ते व मतदार राजाने विश्वास ठेऊ नये जनता जनार्दन हाच पक्ष म्हणूनच अपक्ष पक्ष आहे असे मा.आमदार शिरीषदादा यांनी सांगितले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *