ओबीसीचा प्रत्येक कार्यकर्ता आता आरक्षणासोबत ओबीसी आमदार बाबतचीच चर्चा करेल:- भिमराव महाजन
1 min read

ओबीसीचा प्रत्येक कार्यकर्ता आता आरक्षणासोबत ओबीसी आमदार बाबतचीच चर्चा करेल:- भिमराव महाजन

Loading

ओबीसीचा प्रत्येक कार्यकर्ता आता आरक्षणासोबत ओबीसी आमदार बाबतचीच चर्चा करेल:- भिमराव महाजन

(प्रत्येकाला आपल्या हक्काविषयी लढण्याचा अधिकार आहे पण कुणी आपले हक्क अधिकार हिसकाऊन घेत असेल तर त्या विरोधात आवाज उठविणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे.)

ओबीसी आरक्षणात सरकारने १६७ मराठा आमदारांच्या एकगठ्ठा शक्तीच्या जोरावर नोंदीच्या आडून घुसखोरी सुरु केली.ज्यांना तुम्ही आजतागायत निवडून देवून आमदार खासदार केले तेच आपल्या हक्काच्या आरक्षणावर उठले. त्यातील एकही आता आपल्या एकाही मतामुळे सभागृहात जाणार नाही याची दक्षता आपण आपल्या प्रत्येक मतातून घ्यायला हवी.
यापुढे ओबीसी मतावर ओबीसीच सभागृहात जायला हवे. ओबीसी संघर्षयोद्धा यांना येवल्यातून पाडण्याची भाषा केली जात आहे. “तुम्ही एक भुजबळ पाडा आम्ही तुमचे १६० पाडू” किमान आपल्या ओबीसी मतामुळे तरी ते विजयी व्हायला नकोत.त्यासाठी ओबीसीतून सक्षम उमेदवारही पुढे यायला हवेत.
मराठा आमदार/मंत्री ज्यांनी ज्यांनी ओबीसी विरोधात उघड अथवा मुक संमती दिली त्यातील एकही २०२४ ला ओबीसीच्या मतावर सभागृहाचे सदस्य होणार नाहीत याची काळजी ओबीसी मतदारांनी घ्यायला हवी.ओबीसी मतदार बांधवांनो, १६० जणांना पाडण्याची सुरुवात तुमच्या मतदारसंघातुन करा ओबीसी द्वेष्ट्यांना तुमचे एकही मत मिळाले नाही पाहिजे.
भावांनो, ओबीसी चळवळीसाठी झटणारा, ओबीसी आरक्षणाचे संरक्षणासाठी लढणारा सामान्य ओबीसी बांधव जरी ओबीसी धर्तीवर उभा राहिला तर त्यास मतपेटीतून भरभरुन फुलांची उधळण करा. तुम्हास जेसीबीतून फुलांची उधळण करा म्हणणार नाही मात्र मतपेटीतून करायला विसरु नका.
१६० पाडण्यासाठी एकही ओबीसींचे मत त्या व्यवस्थेस पडता कामा नये.
प्रत्येक मतदारसंघात ओबीसी नेतृत्वांनी उमेदवारी करण्यासाठी पुढे यावे. नेतृत्वांनी निर्धोकपणे, निर्भिडपणे आपापल्या मतदारसंघात गावनिहाय ओबीसी मतदारसंख्या संकलीत करुन त्यांच्या मन व मतपरिवर्तनासाठी केडरकॅंप लावावेत.

*भिमराव महाजन*
समता सैनिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *