महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी येथे.. शिक्षक दिवस व चक्रधर स्वामी जयंती साजरी.
1 min read

महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी येथे.. शिक्षक दिवस व चक्रधर स्वामी जयंती साजरी.

Loading

महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पिंपळी येथे.. शिक्षक दिवस व चक्रधर स्वामी जयंती साजरी.

5 सप्टेंबर 2024 रोजी
डॉ,सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व श्री चक्रधर स्वामी जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून… ग्रामविकास मंडळ पिंपळी, अध्यक्ष, सचिव व सर्व कार्यकारी मंडळातर्फे…
विद्यालयाचे मुख्याध्यापक ,
शिक्षक, शिक्षकेतर वृंद या सर्वांचा शिक्षक दिना निमित्त सन्मान करण्यात आला…
याप्रसंगी इयत्ता पाचवी ते दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती असलेले आपले आदर भाव आपल्या शब्दातून व्यक्त केले.
शिक्षक दिनानिमित्त विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस ” स्वयंशासन ” या उपक्रमांतर्गत संपूर्ण शाळेचे कामकाज चालवले.
यात मुख्याध्यापक , शिक्षक लिपिक ,शिपाई असे पदे भूषवले…. विद्यार्थी शिक्षकांनी दिवसभरातील सर्व वेगवेगळे विषयांच्या तासिका घेतल्या.
सन्मान सोहळा कार्यक्रमा
प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रेमराज वामनराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात आपल्या आयुष्यातील पहिला गुरु म्हणजेच आई वडील असून त्यांचा आणि शिक्षकांचा नेहमी आपल्या जीवनात आदर करावा असे सांगितले. …
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हेच खरे शिक्षक दिवसाचे मानकरी आहेत. असे मुख्याध्यापक विकास शेलकर सर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले…

डॉक्टर श्री जीवनलाल जाधव यांनी आपले अध्यक्षीय भाषणात संत कबीरांचे अनेक दोहे आणि त्यांचे स्पष्टीकरण देऊन शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला.
शिक्षक सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन इयत्ता 10वी वर्गातील विद्यार्थिनी कुमारी संजना संदीप महाजन हिने केले.
श्री दिनेश सावळे सर यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *