मुकेश पाटील व उपशिक्षिका श्रीमती अर्चना बागुल ग्रामस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित,जवखेडे येथे ग्रामस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
1 min read

मुकेश पाटील व उपशिक्षिका श्रीमती अर्चना बागुल ग्रामस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित,जवखेडे येथे ग्रामस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

Loading

मुकेश पाटील व उपशिक्षिका श्रीमती अर्चना बागुल ग्रामस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जवखेडे येथे ग्रामस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

अमळनेर प्रतिनिधी
आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवखेडे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे आदर्श गाव जवखेडे येथील ग्रामस्थांनी ग्रामस्तरीय शिक्षक पुरस्कार देण्याचा कार्यक्रमदेखील यावेळी आयोजित करण्यात आलेला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ कविता प्रफुल्ल पाटील यांनी भूषविले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन ईशस्तवन तसेच स्वागत गीत याचे नियोजन केलेले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले.प्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. छगन पंढरीनाथ पाटील सर यांनी पुरस्काराचे महत्व व परंपरा विशद केली. यानंतर शाळेचे उपशिक्षक श्री मुकेश मुरलीधर पाटील व उपशिक्षिका श्रीमती अर्चना मनीलाल बागुल यांना ग्रामस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच शाळेतील मुख्याध्यापक व इतर शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला. यानंतर पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपले मनोगत व कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाबद्दल माहितीपर भाषण सादर केले. आजच्या शिक्षक दिनाचे संपूर्ण नियोजन इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी केले तसेच आज काही विद्यार्थी शिक्षक झाले होते त्यांनी देखील आपले मनोगत यावेळी सादर केले. आजच्या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा ताईसो सौ. कविता प्रफुल्ल पाटील तसेच मा.श्री. जिजाबराव पाटील, बाला उपक्रम समितीचे अध्यक्ष मा.श्री. प्रशांत पाटील मा.श्री. चुडामण पाटील मा.श्री. नेताजी पाटील मा.श्री. सुरेश पाटील, मा. प्रफुल्ल पाटील मा.श्री. रविंद्र माळी,मा.श्री. दिनकर पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. सुनिता पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्रीम. रत्नप्रभा साळुंखे मॅडम,श्रीम. अर्चना बागुल मॅडम, श्री माधवराव ठाकरे सर, श्री मुकेश पाटील सर यांनी परिश्रम घेतले विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *