अमळनेरात युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने  विजय शेंडगेचा जाहीर निषेध, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन, विजय शेळके विरुद्ध त्वरित कारवाई करा..
1 min read

अमळनेरात युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने विजय शेंडगेचा जाहीर निषेध, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन, विजय शेळके विरुद्ध त्वरित कारवाई करा..

Loading

अमळनेरात युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने विजय शेंडगेचा जाहीर निषेध

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन

विजय शेळके विरुद्ध त्वरित कारवाई करा..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकुन परिट धोबी समाज व संत गाडगेबाबा प्रेमीच्या भावना दुखावल्या बद्दल स्वयंघोषित लेखक विजय शेडगे यांच्या जाहीर निषेध करण्यात आला
वाडी चौक अमळनेर येथे ‘ संत बाबा की जय ‘ आणि ‘ गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ‘ असा गजर करीत राष्ट्रसंत गाडगे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विजय शेळके विरुद्ध त्वरित कडक कारवाई करण्यात यावी. यासाठी उपविभागीय अधिकारी साहेब मा. महादेव खेडकर व पोलीस निरीक्षक साहेब विकासजी देवरे यांना निवेदन देण्यात आले ..

त्याप्रसंगी परीट समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री सुरेशजी ठाकरे , परिट समाज उत्तर महाराष्ट्रप्रसिद्धी राकेश वाघ अमळनेरचे अध्यक्ष रवींद्र जाधव ,धरणगावचे अध्यक्ष छोटूभाऊ जाधव ,पारोळ्याचे अध्यक्ष विजय वाघ ,पिळोदाचे अध्यक्ष किशोर निकुंभ, जाधव इंग्लिश क्लासेस चे संचालक विनोद जाधव,गंगाराम वाल्हे , सामाजिक कार्यकर्ते दिपक वाल्हे , अनिल वाघ ,भरत जावदेकर माजी अध्यक्ष गुलाबराव जाधव अमृत जाधव , मोतीलाल जाधव प्रा. अनिल पवार, परीट समाजाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्याध्यापक जगतराव निकुंभ, हेमंत महाले विकी जाधव प्रवीण वाघ व तालुक्यातील समाज बांधव व माता-भगिनी व संत गाडगेबाबा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *