पुरोगामी समाज उभारणीमध्ये प्रा अशोक पवार यांचे कार्य प्रेरणादायी
1 min read

पुरोगामी समाज उभारणीमध्ये प्रा अशोक पवार यांचे कार्य प्रेरणादायी

Loading

पुरोगामी समाज उभारणीमध्ये प्रा अशोक पवार यांचे कार्य प्रेरणादायी

ज्ञानाने माणूस मोठा होत असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणूसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रा.अशोक पवार सर…
धैर्य ,अविरत,मेहनत ,जिद्द ,चिकाटी कमालीची बुद्धिमत्ता ,ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा या सर्वांबरोबर निर्मळ व प्रेमळ स्वभाव कोणत्याही परिस्थितीत हसतमुख व प्रसन्न व्यक्तिमत्व या परमेश्वराने बहाल केलेल्या अनमोल गुणांचे तेजोमय व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय आमचे मार्गदर्शक प्रा.पवार सर…
पुरोगामी समाज उभारणीसाठी वंचित बहुजनांच्या अंत्योदयाचा अथक ध्यास,निर्भय तत्वनिष्ठ संघर्ष, सत्यनिष्ठा, क्रांतदर्शी समर्पित सेवाशिलता, विज्ञाननिष्ठ आचरण,बहुजनांचा
वारसा आपण धिरोदात्तपणे चालवतात . जातिवंत शिक्षकांमध्ये समाजशिक्षक दडलेला असतो . समाजोन्नतीसाठी रक्त सळसळणे, विधायक कामासाठी आपले हात उत्स्फूतपणे नि:स्वार्थीपणे सरसावणे , अन्याय होत असला तर विनाविलंब जे निर्भयपणे सर्व शक्तीनीशी पाठराखण करीत मार्गदर्शन करणे, विधायक जिथे घडते तिथे विनम्रपणे सक्रिय सहभाग असतो… दरवर्षी ला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्बोधन पर कार्यक्रम घेणारे पवार सर आहेत.. आपण समाजाचे देणे लागतो  या भावनेने ते सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात..
बहुजन समाजाचे कार्य प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे.. यासाठी व्याख्याते तयार करून एक मोठी फळी तयार करणारे पवार साहेब वंदनीय आहेत..

मैत्रीचा अथांग भवताल सदासर्वदा हरीत व सुजलाम सुफलाम करून विशुद्ध मैत्रीचे पीक जोमानी काढतोय .तुमच्या अदम्य उत्साहाला, निरपेक्ष परोपकारी वृत्तीला, अविरत सर्वस्तरीय कार्य आपण तन, मन ,धन अर्पण करून महात्मा फुले यांच्या प्रमाणे स्वत्व विसर्जित करून सामाजिक . संसार समर्पण शीलतेने करून समाज , घराणे, कर्मभुमी , जन्मभुमी,शिक्षकी पेशाचा नावलौकीक प्रतिदिन प्रतिक्षण वर्धिष्णू करीत आहात याचा रास्त अभिमान वाटतो ….
कदम ऐसा चलो, की निशान बन जाये !

काम ऐसा करो की पहचान बन जाये!

यँहा जिंदगी तो सभी जी लेते है !

मगर जिंदगी जियोे तो ऐसीे !

कि सबके लिए मिसाल बन जाये!……

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं
जगताना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

शब्दसंकलन
ईश्वर आर महाजन
मुख्यसंपादक
मराठी लाईव्ह न्युज
तालुकाध्यक्ष
डिजीटल मिडिया असोसिएशन
सहसचीव
व्हाईस मिडिया अमळनेर
9860352960

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *