प्रताप’ मध्ये संशोधन पद्धतीवर व्याख्यान
![]()
‘ *प्रताप’ मध्ये संशोधन पद्धतीवर व्याख्यान*
———————————————
इतिहास संशोधक डॉ.भी.ना.पाटील यांचे होणार व्याख्यान
———————————————
अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त),अमळनेर आणि रुसा संस्थेच्या वतीने प्रायोजित व्याख्यान दि 4 सप्टेंबर बुधवार रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात दुपारी 12.00 वा संपन्न होणार आहे. प्रस्तुत व्याख्यान “*समाजशास्त्रातील संशोधन पद्धती*” या विषयावर असून प्रमुख वक्ते मा.डॉ.भि.ना.पाटील
( जेष्ठ इतिहास संशोधक, माजी अधिष्ठाता ,इतिहास अभ्यास मंडळ, चेअरमन, मानव्या विद्या शाखा क. ब. चौ. उ. म. वि. जळगाव तसेच माजी प्राचार्य एम. एम. महाविद्यालय माजी प्राचार्य) हे मार्गदर्शन करणार आहेत. सदरच्या समारंभासाठी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ अरुण जैन सर आणि संस्थेचे सह सचिव डॉ.धीरज वैष्णव यांची उपस्थिती लाभणार आहे.
तरी सर्व पदवी, पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी, संशोधक, मार्गदर्शक व प्राध्यापक, समाजातील अभ्यासक बंधू-भगिनीनी यांनी प्रस्तुत व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतिहास विभाग व संशोधन केंद्र तसेच सामाजिकशास्त्राच्या विविध विषयाचे विभाग प्रमुख आणि महाविद्यालयीन प्रशासन यांच्या कडून करण्यात येत आहे.

