एकच जिद्द वाढवण बंदर रद्द !
1 min read

एकच जिद्द वाढवण बंदर रद्द !

Loading

एकच जिद्द वाढवण बंदर रद्द !

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

एकच जिद्द वाढवण बंदर रद्द !
या एका मागणीसाठी पालघरचे मच्छिमार, आदिवासी, शेतकरी, महिला आणि स्थानिक हजारोंच्या संख्येने शंखोदर, वाढवणच्या समुद्र किनाऱ्यावर जमले होते. मोदी गो बॅकच्या घोषणेने परिसर दणाणून निघाला.

प्रधानमंत्री वाढवण बंदराची पायाभरणी करण्यासाठी आले, पण किनारपट्टीच्या जनतेने त्यांना काळे झेंडे दाखवत आपला निषेध नोंदवला.

यावेळी समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष कपिल पाटील, कम्युनिस्ट आमदार विनोद निकोले, एनसीपी (शप) आमदार सुनील भुसारा, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे नारायण पाटील, विनीत पाटील, किरण कोळी, ब्रायन लोबो, पूर्णिमा मेहेर, वैभव वझे.

लोकांच्या असंतोषला घाबरून किनाऱ्यावरपट्टीपासून दूर पालघरला त्यांना पायाभरणी करावी लागली. जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोलीस बंदोबस्त आहे. लोकांना बाहेर पडू दिलेलं नाही. तरीही हजारो लोकं निषेधासाठी जमले. पायाभरणीसाठी स्थानिकांना बसेस देण्यात आल्या होत्या पण त्यांनी त्या बसेसही रिकाम्या परत पाठवल्या.

हा प्रकल्प झाला तर केवळ वाढवण नाही तर मुंबईपर्यंतचे किनारपट्टीचे सगळे मच्छिमार उद्ध्वस्त होणार आहेत. शेतकरी आणि आदिवासी यांचीही वाताहत होणार आहे. त्यांची कोणतीही हमी न घेता सरकार हे राबवत असेल तर त्याला लोक विरोध करतील. बंदराचा हा आटापिटा कशासाठी आहे, देशाच्या विकासासाठी की अदानीच्या विकासासाठी ?, अशा शब्दात कपिल पाटील यांनी भूमिका मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *