मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणूक निकालाला आव्हान देणारी सुभाष किसन मोरे यांची उच्च न्यायालयात याचिका*
1 min read

मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणूक निकालाला आव्हान देणारी सुभाष किसन मोरे यांची उच्च न्यायालयात याचिका*

Loading

 

*मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणूक निकालाला आव्हान देणारी सुभाष किसन मोरे यांची उच्च न्यायालयात याचिका*

मुंबई, दि. 29 ऑगस्ट 2024 (प्रतिनिधी) :
मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणूक निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार सुभाष किसन मोरे यांनी दाखल केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुंबई शिक्षक मतदार संघातून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ज मो अभ्यंकर निवडून आले आहेत. सुभाष किसन मोरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत ज मो अभ्यंकर अपात्र मतदारांची नोंदणी करून निवडून आल्याचा दावा केला असून त्यांची निवड रद्द करण्याची मागणी केली आहे.

*आक्षेप काय?*
ज मो अभ्यंकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून विविध विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शैक्षणिक संस्थांमधील प्राथमिक शिक्षक आणि काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोंदणी केली. शिक्षक मतदार संघात मतदार म्हणून नोंदणी करण्याचा अधिकार केवळ माध्यमिक आणि त्यावरील वर्गांना शिकवणारे शिक्षक यांना आहे. प्राथमिक, पूर्व प्राथमिक (प्ले ग्रुप, नर्सरी, बालवाडी इत्यादी) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना नोंदणी करता येत नाही. त्याबाबत घटनेतील तरतुदी स्पष्ट आहेत. 22 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मतदारांची नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे. ज मो अभ्यंकर यांनी बोगस मतदारांची नोंदणी करून निवडणूकीत विजय प्राप्त केला आहे. अशा अपात्र बोगस मतदारांची संख्या 1000 पेक्षा अधिक आहे. मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीत सुभाष मोरे यांच्यापेक्षा केवळ 68 मते अधिक मिळाल्याने ज मो अभ्यंकर दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे विजयी घोषित करण्यात आले आहेत.

सुभाष मोरे यांनी दाखल केलेली याचिका मा उच्च न्यायालयाने मान्य करून ज मो अभ्यंकर यांना समन्स बजावण्यात आले आहेत.

*संविधानाचा अपमान*
मुंबईतील शिक्षकांची फसवणूक करून निवडून आलेले उमेदवार ज मो अभ्यंकर यांनी संविधानचा अपमान केला आहे. शैक्षणिक संस्थांची दिशाभूल करून अपात्र मतदारांच्या मतांवर विजय प्राप्त केल्याने कोणत्याही दबावाला/अमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे मतदान करणाऱ्या मतदारांच्या भावना दुखावल्या आहेत. मा उच्च न्यायालय या प्रकरणी चौकशी करून न्याय देईल अशी अपेक्षा याचिकाकर्त्ये उमेदवार सुभाष किसन मोरे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *