शाळेत वातावरण प्रसन्न असेल तर विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागते-ना.अनिल पाटील, एखादा खासदार स्मिताताई वाघ यांचा मंत्री अनिलदादा पाटील यांच्या उपस्थितीत शिरसाळे येथे भव्य सत्कार*
![]()
*खासदार स्मिताताई वाघ यांचा मंत्री अनिलदादा पाटील यांच्या उपस्थितीत शिरसाळे येथे भव्य सत्कार*
अमळनेर प्रतिनिधी
शिरसाळे तालुका अमळनेर येथील पूज्यश्री साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ तसेच ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघातून प्रथम महिला खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिलदादा पाटील यांच्या उपस्थितीत शिरसाळे येथे भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले. शालेय समितीचे चेअरमन रामलाल पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन पाटील व हिरालाल पाटील,तरवाडे सरपंच रामकृष्ण पाटील,शिरसाळे सरपंच माधुरी सूर्यवंशी,आटाळे सरपंच रत्नाबाई पाटील,मा. बाजार समिती सदस्य प्रकाश पाटील, संस्थेचे अध्यक्ष संजय शिरोडे, सेक्रेटरी जगतराव पाटील, संचालक युवराज पाटील गोरख पाटील विनायक पाटील पोपट चौधरी प्रमुख पाहुणे म्हणुन व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेत पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीनुक्त स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे, संरक्षक भिंतीचे व व्यायाम शाळेचे भूमिपूजन तसेच शिरसाळे ग्रामपंचायत तर्फे सुरू असलेल्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन देखील खासदार श्रीमती स्मिताताई वाघ व मंत्री अनिलदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शिरसाळे पंचक्रोशीत पूज्यश्री साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय शिरोडे त्यांचे संचालक मंडळ व ग्रामस्थांनी शाळेच्या माध्यमातून जे शैक्षणिक कार्य चालविलेले आहे ते खरोखर उल्लेखनीय आहे त्यामुळे गावातून अनेक तरुण पुढे गेलेले आहेत. शाळेत वातावरण प्रसन्न असेल तर विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागते एखादा रस्ता झाला नाही तरी चालेल पण पुढच्या पिढ्या घडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. गावाचे भविष्य हे शाळेत घडविले जाते. या शाळेला सर्वतोपरी मदत करू. तालुक्यातून सर्व सामान्य परिस्थितीतील विद्यार्थी कोटा दिल्ली पुणे जाऊ शकत नाही त्यासाठी सर्व प्रकारच्या उच्च शिक्षणाच्या सोयी तालुक्यात झाल्या पाहिजे अमळनेर तालुका एज्युकेशनल हब बनवायचा आहे त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मला शेतकऱ्यांच्या व्यथा चांगल्या कळतात शेतकरी जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे मंत्री म्हणून मला शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी जनतेने दिली आहे जेवढं काम करता येईल ते प्रामाणिकपणे करेल. त्याचप्रमाणे तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी 100 हेक्टर मध्ये एमआयडीसी उभारण्याचा मानस आहे. पाणीपुरवठा योजना, विज बिल माफी, नद्या नाले जोड योजना रस्त्यांचे प्रश्न सिंचनाचे प्रश्न यावर काम वेगाने सुरू आहे आपल्या सर्वांच्या सहकाऱ्यांने अजून खूप काम करायचे आहे. आता खासदार स्मिताताई यांच्या माध्यमातून आपल्याला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हाक मारण्यासाठी हक्काचा माणूस मिळालेला आहे. असे प्रतिपादन याप्रसंगी मंत्री अनिलदादा पाटील यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या शिरसाळे हे विविध जाती धर्मांचे गाव असून येथे कमालीची एकता आहे. येथील शाळेच्या संस्थाचालकांनी शाळेला उत्पन्नाचे साधन कधीच मानले नाही विद्यार्थी विकास हेच प्रमुख लक्ष आहे. याच शाळेमुळे गावातील शेकडो तरुण-तरुणी उच्च शिक्षित होऊन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गावाचे नाव पुढे नेत आहेत. यापुढे गावाला व शाळेला सर्वतोपरी मदत करू असे आश्वासनही त्यांनी दिले त्या पुढे म्हणाल्या तालुक्याने मला सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून खूप प्रेम दिले भरघोस मतांनी निवडून लोकसभेवर पाठविले. मी जनतेचा विश्वास सार्थ ठरवेन.
याप्रसंगी ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी व पोलीस पाटलांतर्फे खासदार स्मिताताई वाघ व मंत्री अनिलदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला शिरसाळे तरवाडे आर्डी अनोरे ढेकू आटाळे पिंपळे खडके जवखेडे गलवाडे झाडी वावडे मुडी मांडळ येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी ए भदाणे यांनी केले, सूत्रसंचालन पी आर पवार तर आभार एन आर जैन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, पोलीस पाटील व शिरसाळे ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले.


