सरकारचे कामकाज कमी, जाहिरात जास्त -प्रा.सुभाष पाटील
![]()
सरकारचे कामकाज कमी, जाहिरात जास्त
किसान काँग्रेस जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.सुभाष पाटील यांचे प्रतिपादन
अमळनेर प्रतिनिधी
जिल्ह्यात एक महिना झाला पीकविमा मंजूर जो पीकविमा पैसा एप्रिल महिन्यात मिळायला पाहिजे तो अगाष्ट संपत आला तरी वाटप होत नाही कंपनी बोट सरकारकडे दाखवते सरकार रोज नवीन घोषणा करते कोणतीही योजना पूर्णपणे कार्यान्वित होत नाही तो पर्यंत नवीन घोषणा असते…
मागे फडवणीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या नावाने कर्ज माफी दिली.. त्यातली अजूनही खूप नावे नियमात पात्र असूनही कर्ज माफी पासून वंचित आहेत त्यावर कोणीही आवाज काढत नाही त्यानंतर ठाकरे सरकारने महात्मा फुले कर्ज माफी योजना आणली त्यातली २लाखा वरील कर्जदार पात्र असूनही वंचित त्यावर कोणीही बोलत नाही ..आमदार ,मंत्री त्यांच्या धुंद्दित आहेत ..कमिशन मिळेल त्या कामांवर लक्ष.. बाकी काहीही नाही
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा शिंदे सरकारने केली.. परंतु योजने हजारो पात्र शेतकरी वंचित किसान काँग्रेस जळगांव मार्फत प्रत्येक बाबीवर वेळोवेळी निवेदन,आंदोलन करूनही नवीन यादी अजून आली नाही..
कापुस ,सोयाबीन अनुदान यादी प्रचंड घोळ. हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाईन पिकपेरां करूनही संकरित कापुस नोंद असलेले,तसेच सॉफ्टवेअर चुकीमुळे कापुस पेरा करूनही अधिकारी अजूनही यादी दुरुस्त करत नाही.. चूक शासनाची शिक्षा मात्र शेतकऱ्यांना
रोज नवीन योजना घोषित करायची, मागील प्रश्न लोमकळत ठेवायचे
म्हणून सांगतो सरकार चुकीच्या लोकांच्या हातात आहे त्यांना येणाऱ्या निवडणुकीत घरचा रस्ता दाखवा असे प्रा सुभाष पाटील कार्याध्यक्ष किसान काँग्रेस जळगांव जिल्हा यांनी बोलतांना सांगितले..


