अमळनेर चा रोहित चौधरी आयरलेंड (युरोप )ला.. M.S.च्या शिक्षणासाठी रवाना
![]()
प्रेरणादायी बातमी..
अमळनेर चा रोहित चौधरी आयरलेंड (युरोप )ला.. M.S.च्या शिक्षणासाठी रवाना
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करावयास हवा. यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असतांना अनेक संकटे समोर उभी राहतात पण या संकटांना न डगमगता आपण पुढे मार्गक्रमण करत राहिल्यास हमखास यश प्राप्त होते हे निंभोरा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.आर.चौधरी यांचा मुलगा रोहित चौधरी याने आयरलेंड (युरोप )ला.. M.S. करायचे होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो आयर्लंड ला जात असल्याने नातेवाईक, परिवार व मित्रपरिवाराने आनंद व्यक्त केला आहे ..
सविस्तर माहिती अशी कि
एन. आर. चौधरी (मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय निंभोरा ता. अमळनेर ) व श्रीमती पुष्पलता चौधरी (पदवीधर शिक्षिका, बालमोहन विद्यालय चोपडा ) यांचे जेष्ठ चिरंजीव रोहित नारायण चौधरी याची नुकतीच उच्च शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी ऑफ गॅल्वे आयरलंड (यूरोप ) येथे मास्टर ऑफ सायन्स इन सायबर सिक्युरीटी या शिक्षणासाठी निवड झाली.
त्यासाठी रोहित आज मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळ वरून आयर्लंड ला रवाना झाला, त्या वेळी त्याचे मित्र ,परिवार आणि नातेवाईक रोहित ला शुभेच्छा देण्यासाठी हजर होते सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या..
रोहित चौधरी व त्याच्या संपूर्ण परिवाराचे अभिनंदन हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे, ज्ञानेश्वर इन्सुलकर उपाध्यक्ष, सचीव दिलीप पाटील ,मार्गदर्शक दिपक पवार (माजी अध्यक्ष), मार्गदर्शक सोपान भवरे,
राजेंद्र पाटील कोषाध्यक्ष, परीक्षा समिती सदस्य कमलाकर संदानशिव, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन,
प्रदीप चौधरी,मुनाफ तडवी, डॉ.किरण निकम,श्रीमती मंगला चव्हाण,श्रीमती जाधव,श्री.प्रशांत वंजारी,श्रीमती योगेश्री पाटील,श्रीमती कविता मनोरेसह मित्र परिवार यांनी केले..

