जिद्द व चिकाटी च्या जोरावर परसोडे शेतकरी कन्या विदया पाटील पहिल्या प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक
1 min read

जिद्द व चिकाटी च्या जोरावर परसोडे शेतकरी कन्या विदया पाटील पहिल्या प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक

Loading

जिद्द व चिकाटी च्या जोरावर
परसोडे शेतकरी कन्या विदया पाटील पहिल्या प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक

शिंदखेडा प्रतिनिधी
परिस्थितीशी दोन हात करणारी परसोडे येथील विद्या पाटील बनली पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक…
माणसाने जिद्द चिकाटी
आत्मविश्वास ठेवला तर कुठलेही यश व यशाचे शिखर गाठता येते परिस्थिती नसली तरी आपली बुद्धिमत्ता व अभ्यासाच्या जोरावर व परिस्थितीचे भांन ठेवून आई-वडील व गुरुजनांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपले यशाचे शिखर गाठता येते अपयश आले तर आपल्या परिस्थितीवर फोडत असतात मात्र या गोष्टीला अपवाद ठेवत दोन हात शेतीशी प्रामाणिक कष्ट करणाऱ्या परसोडे येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील आई-वडिलांना मदत करणारी पाटील कुटुंबातील विद्या नंदलाल पाटील यांना दोन मुलं दोन मुली एक मुलगा देश सेवा करीत आहे विद्या पाटील या कन्येने शालेय शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळेत एका खेड्या गावात परसोडे खर्दे दोंडाईचा पुणे बीएससी मॅथेमॅटिक मध्ये शिक्षण घेऊन. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास केला शिक्षण घेत असताना परिस्थितीवर मात देऊन स्पर्धा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले तिच्या यशाबद्दल खर्दे येथील मामा व आजोबा साहेबराव भबुता पाटील आपली नातीने स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्यामुळे कुटुंबाचे समाजाचे व गावाचे नाव लौकिक केले पोलीस निरीक्षक परीक्षा पास झाल्याने तिचा सन्मान सोहळा व किर्तन ह भ प पांडुरंग महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित व संपूर्ण गावाला चहा पाण्याचा कार्यक्रम करण्यात आला होता तिच्या या यशाबद्दल परसोडे येथील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले

चौकट
प्रत्येकाने परिस्थितीला दोष न देता जिद्द चिकाटी व नियमितपणे अभ्यास व आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवत आपण यशाचे शिखर गाठू शकतो
विद्या पाटील
परसोडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *