कल्याण शिंपी समाजातर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न कल्याण शिंपी समाजाचे कार्य अभिमानास्पद- आमदार विश्वनाथ भोईर
1 min read

कल्याण शिंपी समाजातर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न कल्याण शिंपी समाजाचे कार्य अभिमानास्पद- आमदार विश्वनाथ भोईर

Loading

कल्याण शिंपी समाजातर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न

कल्याण शिंपी समाजाचे कार्य अभिमानास्पद- आमदार विश्वनाथ भोईर

ठाणे: कल्याण( प्रतिनिधी) श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजोन्नती मंडळ, कल्याण तर्फे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 674 वा संजीवन समाधी सोहळा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समाजाचे अध्यक्ष श्री किशोर बागुल, उपाध्यक्ष श्री अरविंद शिंपी, सचिव श्री गणेश साळवे, खजिनदार प्रवीण भांडारकर,व सदस्य श्री.काशिनाथ जगताप सर, श्री शिवदास शिंपी, श्री दत्तात्रय शिंपी, श्री दत्तात्रय खैरनार,श्री.सुनील मांडगे, श्री .सुरेश जगताप, व श्री सचिन सोनवणे,व प्रमुख सल्लागार श्री रवींद्र नेरपगार, व श्री सुभाष बाविस्कर,श्री.शिरीष भांडारकर , श्री.मनोहर सोनवणे ,
आर.एस.पी कमांडर श्री.मणिलाल शिंपी व महिला अध्यक्ष.श्रीमती. मंगलाताई पवार, व महिला कार्यकारणीने हा कार्यक्रम यशस्वी होण्यास हातभार लावला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शिरीष भांडारकर व सौ वैशाली ताई भांडारकर, यांनी घेतला. कल्याणचे आमदार श्री. विश्वनाथ दादा भोईर, कल्याण शहर शिवसेना प्रमुख, रवी पाटील, माजी नगरसेवक व बोरगावग्रुपचे संचालक श्री. उमेश बोरगावकर, हे आमंत्रित पाहुणे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील शिंपी यांनी उत्कृष्ट पद्धतीने सादर केले. आमदार श्री विश्वनाथ भोईर यांनी समाजासाठी आपला अमूल्य वेळ दिला व शिंपी समाजासाठी आम्ही नेहमीच मदत करत राहू असे आश्वासन दिले. हॉल पूर्ण भरल्यामुळे त्यांनी आपल्या समाजाचे कौतुकच केले. तसेच श्री.रवी पाटील साहेबांनी समाज संघटन कसे असावे त्यासाठी काय करावे या विषयावर भाषण केले. बोरगावकर ग्रुपचे संचालक उमेश बोरगावकर यांनी सुद्धा ओबीसी चे रक्षण कसे करता येईल यासाठी आपल्या कार्यक्रमात इतर समाजाच्या अध्यक्षांना सुद्धा बोलवावे म्हणजे ओबीसी संघटन तयार होईल. व आपल्या समाजाची वास्तू रिडेव्हलपमेंट साठी त्यांनी घेतलेली आहे त्या संदर्भात समाजाचे उपाध्यक्ष श्री.अरविंद शिंपी यांनी श्री.बोरगावकर साहेब यांना आपल्या वास्तु विषई समाज बांधवांचे काही प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांचे श्री बोरगावकर यांनी समर्पक उत्तरे समाज बांधवांना दिली तसेच मी तुम्हाला व्यवस्थित असा व भव्य दिव्य हॉल बांधून देणार असं वचन दिले. श्री रविंद्र नेरपगार यांनी संपूर्ण कमिटीचे कौतुक केले समाजाच्या वास्तू बद्दल थोडक्यात योग्य माहिती दिली व समाजाच्या वास्तूसाठी संपूर्ण निधी कल्याण मधील समाज बांधवांनी उभा करून दिल्याबद्दल कल्याण शिंपी समाज बांधवांबद्दल अभिमान व्यक्त केला व देणगीदारांचे आभार मानले
श्री सुभाष बाविस्कर यांनी आपल्या भाषणात समाज कार्यकारणीने कमी वेळेत भरपूर इमारत निधी वर्गणी रुपाने समाजाच्या बैंक खात्यात जमा केला ही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.याकरिता श्री.किशोर बागुल, श्री.गणेश साळवे,श्री.प्रवीण भांडारकर, श्री.अरविंद शिंपी, सदस्य:-श्री.दत्तात्रय निकुंभ,श्री.दत्तात्रय खैरनार(D.J),श्री.काशीनाथ शिंपी सर,श्री.सुरेश जगताप, श्री.सुनिल शिंपी,श्री.शिवदास शिंपी,श्री.सचिन सोनवणे सल्लागार श्री.रविंद्र नेरपगार,सुभाष बाविस्कर तसेच श्री.शिरीष भांडारकर, आर.एस.पी. कमांडर डॉ.मणिलाल शिंपी,श्री.मनोहर सोनवणे , श्री.बाळकृष्ण कापडणे ,श्री.संजय बाविस्कर, श्री.दत्तात्रय खैरनार श्री.संदीप सोनवणे,
श्री.दिनेश शिंपी (गवांदे), कल्याण पूर्व मधील ज्येष्ठ समाजसेवक अरविंद दिगंबर शिंपी तसेच कल्याण शिंपी समाज महिला अध्यक्ष श्रीम.मंगला पवार,सौ.सुलभा कटके,श्रीम.संध्या निकम व श्रीम.वर्षा बाविस्कर व कार्यकारिणी यांनी खुप मेहनत घेतली त्याबद्दल या सर्वांचे कौतुक केले. समाजाचे उपाध्यक्ष श्री.अरविंद शिंपी यांनी समाज बांधवांच्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक दिलीत.
दुपारी भोजनाच्या कार्यक्रमात महाप्रसाद खूप सुंदर प्रकारे देण्यात आला. त्यानंतर ज्यू.के.जी,सिनी.के.जी,तसेच इयत्ता पहिली ते पदवी उच्च पदवी धारकांना बक्षीस व गुणगौरव समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला कल्याण पूर्व व पच्छिम मधील संपूर्ण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जयजयकार करून परिसर दणाणून सोडला. श्री सुनील मांडगे यांनी सगळ्यांचे आभार मानून अध्यक्ष यांच्या परवानगीने राष्ट्रगीतासह समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *