सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थिनींनी स्वतः हातांनी बनवलेल्या राख्यांचे प्रदर्शन
1 min read

सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थिनींनी स्वतः हातांनी बनवलेल्या राख्यांचे प्रदर्शन

Loading

सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थिनींनी स्वतः हातांनी बनवलेल्या राख्यांचे प्रदर्शन

असोदा प्रतिनिधी: सार्वजनिक विद्यालयात असोदा येथे कला आणि कार्यानुभव विषय उपक्रमाअंतर्गत विद्यालयातील विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तूंपासून स्वतः हातांनी सुंदर राख्या बनविल्या आणि त्याचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्यामध्ये आरोही पाटील,विशाखा भोळे,विशाखा पाटील,सिध्दी कोल्हे,सृष्टी डोळसे,ललिता कोळी, वैशाली पाटील,भाग्यश्री कोळी,कोमल नारखेडे,हेमांगी पाटील,प्रज्ञा कापडणे,धनश्री शिंपी,तेजल भोळे ,यश माळी,देवयानी पाटील या विद्यार्थिनींनी आणि इतर विद्यार्थिनीच्या सुद्धा अतिशय सुंदर राख्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या.या प्रसंगी राखी प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री विलासराव चौधरी यांनी केले.सोबत विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल , पर्यवेक्षक श्री.एल.जे.पाटील ज्येष्ठ शिक्षक डी.जी.महाजन, जी.आर.महाजन उपस्थित होते.विद्यार्थिनी स्वतः बनवलेल्या राख्या संस्थेचे अध्यक्ष, विलासराव चौधरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल सर यांना राख्या बांधल्या.प्रदर्शनाचे आयोजन कला आणि कार्यानुभव विभाग प्रमुख श्रीमती.मीनाक्षी कोल्हे यांनी केले.श्रीमती.स्वाती वाघुळदे ,सौ.भावना चौधरी आणि श्रीमती.जागृती नारखेडे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *