लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीला मतदारांनी रस्त्यावर आणले- संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचे अमळनेरला महीला संवाद मेळाव्यात प्रतिपादन अमळनेरला महिला संवाद मेळावा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी केला यशस्वी महीला संवाद मेळावा यशस्वी झाल्याचा आनंद – तिलोत्तमाताई पाटील राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस
![]()
लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीला
मतदारांनी रस्त्यावर आणले…सुप्रिया सुळे यांचे अमळनेरला महीला संवाद मेळाव्यात प्रतिपादन
अमळनेरला महिला संवाद मेळावा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी केला यशस्वीमहीला संवाद मेळावा यशस्वी झाल्याचा आनंद – तिलोत्तमा पाटील
राष्ट्रवादी महिला प्रदेश चिटणीस
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सध्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही , महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे,
सर्वसामान्य जनता महागाईने होरपडून निघाली आहे.. पेपर फुटी प्रकरण, लैंगिक अत्याचार, बेरोजगारी, महागाई ने जनता त्रस्त झाली आहे.. कर्मचारी पेन्शन साठी रस्त्यावर उतरले आहेत, सरकार सुस्त आहे जनता त्रस्त आहे असे सांगत संसद रत्न खासदार सुप्रियाताई म्हणाल्या की
भाजप सरकारने पक्ष फोडला, चिन्ह चोरलं सर्व काही नसतांना जनतेने दिलेलं भरभरून प्रेम व लोकसभेमध्ये दिलेला कौल यातून महायुतीला मतदारांनी जमिनीवर आणलं असे अमळनेर येथे शिवाजी महाराज नाट्य सभागृहात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या संवाद महिला मेळाव्यात संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे बोलत होत्या..
त्या पुढे म्हणाल्या कि
भावाकडून प्रेम हवे,पैसा नको…यांना भाऊ बहीणीचे प्रेम कळलेच नाही. आता बहिणींचे प्रेम पंधराशे रुपयात विकत घेण्याचा महायुती सरकारने प्रयत्न सुरू केला आहे.. पण बहिणी ओळखून आहेत, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहिणी महायुतीला घरचा रस्ता दाखवतील व महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकारी असे सांगितले..
अमळनेरला महाविकास आघाडीचा आमदार निवडून द्या
असे अमळनेरला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहात संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे ‘ताई आपल्या भेटीला’ या महीला मेळाव्यात बोलत होत्या.
प्रस्ताविक राष्ट्रवादी पक्षाच्या महीला प्रदेश चिटणीस तिलोत्तमा पाटील यांनी पक्षाची एकजूट व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी संवाद मेळाव्यात स्वतःहून आले आहेत.. मिळव्यात रोजंदारीचे माणसं नाहीत,
त्यात महिला बंधू भगिनींचे धन्यवाद व्यक्त करत महायुती पक्षाच्या हुकूमशाही धोरणावर टिका केली..व येणाऱ्या निवडणुकीमध्ये अमळनेरला विधानसभेच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार गटाचा आमदार निवडून येईल व महाविकास आघाडीची तालुक्यात एकजूट आहे असे सांगितले..
अँड हेमा पिंपळे बीड ,कमल आक्का
युवती दिपाली बेहरे, वंदना चौधरी, श्रीराम पाटील, मा.पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सत्ताधारी पक्षांना धारेवर धरले ..*यांची होती उपस्थिती*
मा.पालकमंत्री सतीश पाटील,गुलाबराव देवकर, अँड हेमा पिंपळे राज्य प्रक्ते बीड ,मंगलाबाई पाटील जळगांव,डॉ बी.एस.पाटील,मा.आमदार दिलीपराव सोनवणे,तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे उमेश पाटील,अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचीन पाटील, महीला नेत्या इंदीराताई पाटील,ग्रंथपाल संघटनेच्या रिता बाविस्कर,श्रीराम पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष
श्याम पाटील, प्रा.अशोक पवार,काग्रेस पक्षाचे डॉ अनिल शिंदे, उबाठा गटाच्या
अँड ललिता पाटील,प्रशांत निकम,आर.बी.शिंदे,अनंत निकम,विजय पाटील, कुणाल पाटील,काग्रेस पक्षाचे
जयवंतराव पाटील,मनोहर पाटील,
प्रमोद पाटील, वंदना चौधरी, संजय पाटील, अनिल पाटील, दयाराम पाटील,कामराज निकम शिंदखेडा, सह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृह
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भरगच्च भरलेले होते, सुप्रिया ताईंचे भाषण ऐकण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होती, नाट्य सभागृहात बसण्यासाठी जागा नव्हती बऱ्याच महिला खाली बसल्या होत्या..
सुत्रसंचालन साने गुरुजी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचीन पाटील ,शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी मानले..

