कृतिशून्य तत्वज्ञान धर्माला मारक असते- डाॅ.श्री एल. ए. पाटील,
1 min read

कृतिशून्य तत्वज्ञान धर्माला मारक असते- डाॅ.श्री एल. ए. पाटील,

Loading

अमळनेर नगरीत धर्मगुरुंची
सर्वधर्म परिषद उत्साहात संपन्न!!

कृतिशून्य तत्वज्ञान धर्माला मारक असते- डाॅ.श्री एल. ए. पाटील

अमळनेर नगरी ही चळवळीची जशी जननी आहे तशी धर्मा धर्मात एकोपा टिकावा म्हणून नेहमी सजग असते. त्यासाठी विविध धर्माच्या मार्गदर्शकाला सभेला बोलवून शांतता कशी नांदेल याबाबत चर्चासत्रे, सभा, व्याख्याने आयोजित केली जातात. पू .सखाराम महाराज यात्रा ही सर्व लोक गुण्यागोविंदाने पार पाडतात. अमळनेर च्या महिला मंचच्या व अमळनेर पोलीस मंडळाचा सयुक्त सर्वधर्म परिषदेचा कार्यक्रम संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा समालोचक म्हणून नॅनो शास्त्रज्ञ डाॅ.एल. ए.पाटील यांनी आपल्या समालोचनात जगात प्रत्येक धर्माचे तत्वज्ञान श्रेष्ठ आहे मग ते जगतांना का दिसत नाही. आपण समोरच्याने कसे वागले पाहिजे हे सुचवितो. मात्र स्वतःमात्र तसा जगत नाही. त्यामुळे धर्माचे अनुयायी पोकळ तत्वज्ञान सांगतात. जगतांना धर्म सांभाळणाऱ्या लोकांच्या कृतीत दिसत नाही. ते त्याच्यात नसल्याने सर्वांना पोहचत नाही. विविध धर्मावर अभ्यास करणारे अनेक झालेत. औरंगजेबाचा मोठाभाऊ दारा सिकोह याने उपनिषदांचे भाषांतर केले. त्याचे पुढे पारशी भाषेत भाषांतर झाले. प्रदीप मिश्राचे उदाहरण देत हा गुंड माणूस लुबाडणूक करून खोटा धर्म सांगतो. आता आलेला हा भोंदू खोटया गोष्टीत लोकांना भुलवितो. स्टीफन हाॅकींग नवाचा विद्वान सांगतो. जग नियमाने चालते. आपल्या भावना उदात्त असल्या पाहीजे. आत्मपरीक्षण करायला शिकले पाहिजे. बुध्दाने वैज्ञानिक ज्ञान मिळविले. विज्ञान सांगते पुनर्जन्म नाही. सिद्धार्थ बुध्द पातळीवर पोहचले. प्रत्येक ज्ञानाची पायरी ते पूर्ण करित गेले. बुध्दाचा पुनर्जन्म वैचारिक उन्नती आहे. अभ्यासक्रमात सर्व धर्माचे चांगले गुण एकत्रित करुन शिक्षणव्यवस्थेत त्याचा समावेश केला पाहिजे. आज बुधदीमान जितका तो भ्रष्ट बनला आहे. बुध्दीमान झाले परंतू शहाणे झालो नाही ही खंत आहे. Our qualification हे disqualification ठरत आहे. असे सखोल चिंतन नॅनो शास्त्रज्ञ डाॅ.एल ए.पाटील यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमांसाठी रेव्हरंड विशाल गावीत, के.सी. करंजीया, बौध्द धर्मगुरु नागसेन, वेदमूर्ती अमोल शुक्ल, जयसिंग वाघ,बाबा धिरजसिंहजी, मुक्ती मुहम्मद नदवी, मकसूदभाई बोहरी परमिता बहन आदी प्रमुख धर्मगुरु उपस्थित होते. या प्रत्येक धर्मगुरुंनी आपापल्या धर्मातील मूल्ये विशद केली. सर्व धर्मगुरुंच्या बोलण्यातून धर्म हा मानवता उभा करण्यासाठी असतो. धर्माने माणूस जोडला पाहिजे तरच तो धर्म टिकेल. मानव हा धर्माचा केंदबिंदु असला पाहिजे तरच जगात मानवता उभी राहिल. मानवाला उन्नत करणारी मूल्ये धर्म सांगण्यात कमी पडला त्यामुळेच धर्माची नैतिक पकड कमी झाली. धर्माच्या संस्थापकांनी धर्म चांगल्या कामासाठी स्थापन केला. अनुयायी मात्र अनुकरण करण्यात कमी पडले. धर्माने हिंसेकडे वळता कामा नये. धर्माकडून शांती प्रस्थापित न होता युध्द झालीत. धर्माच्या हिंसक वृत्तीने जीवीत हानी झाली. मानवतावादाची मत मांडतांना जगात पहिली धर्म परिषद कश्यप ह्या बुध्द विचारवंताने घेतली. दुसरी धर्म परिषद अशोक सम्राट याने घेतली त्यात युवानस्वाॅन्ग चिनी विचारवंत अध्यक्ष होते. तिसरी धर्म परिषद शिकागो येथे भरली होती. ह्या परिषदांनी मानवतावाद उभा केला. अमळनेर नगरीत महिला मंच व पोलीस टिम ने खूप चांगला उद्देश ठेवून ही परिषद घडवून आणली त्याबद्दल प्रेक्षकांनी दाद दिली. प्रत्येक धर्मगुरुंचा मोमेंटो देऊन, स्कार्फ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. साने गुरुजींच्या कर्मभूमीत कार्यक्रम असतांना त्यांना अपेक्षित असलेला धर्म यावरचे गीत खरा तो एकची धर्म हे सुमधुर स्वरात सादर करण्यात आले. सर्व धर्माची महती साग॔णारे गीत सुध्दा झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर्णा मुठे तर आभार कंचन शहा यांनी मानले .कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन समाजसेविका,सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्या सौ. वसुंधरा लांडगे यांनी केले. संत ज्ञानेश्वरांनी गायिलेले पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी उपस्थिती भाऊसाहेब देशमुख, महेंद्रलाल कोठारी, संजय चौधरी, देशमाने सर, एल जी पाटील, पत्रकार एस. एच. भवरे, रामेश्वर पवार, एस. आर. चौधरी,प्राध्यापक विजय तुंटे ,मुख्याध्यापक देशमुख सर, पोलीस अधिकारी तसेच जिज्ञासू अमळनेरवासी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *