राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचे काम दिल्लीतील अदृष्य शक्तीनी केला..  सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर आरोप
1 min read

राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचे काम दिल्लीतील अदृष्य शक्तीनी केला.. सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर आरोप

Loading

राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचे काम दिल्लीतील अदृष्य शक्तीनी केला..

सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर आरोप

अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था तिनतेरा झाले आहेत.. महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत, गृह विभाग मूग गिळून गप्प बसला आहे ,शेतकरी च्या मालाला भाव नाही, बेरोजगारीची संख्या वाढली आहे ,कर्मचारी पेन्शन साठी आंदोलन करीत आहे सरकार सुस्त आहे.
असे सांगत दहा वर्षात केंद्र व भाजप सरकारने महाराष्ट्राची अवहेलना करून महाराष्ट्राला झुकवण्याचे काम केलं आहे व अदयाप हे काम सुरू आहे.. राष्ट्रवादी, शिवसेना सारख्या पक्षाला दिल्लीतील अदृश्य शक्तींनी फोडला तरी पक्षाजवळ काही शिल्लक नसतांना मायबाप जनतेने भरभरून प्रेम दिले व लोकसभेमध्ये सर्वात जास्त खासदार निवडून आणले
असे अमळनेर येथे शिवाजी महाराज नाट्य सभागृहात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या महिला मेळाव्यात संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे बोलत होत्या..
त्या पुढे म्हणाल्या कि  पुरोगामी विचाराच्या घरात जन्माला आली.. आमच्या घरात मुलगा व मुलींमध्ये कधीच अंतर नव्हतं.. जी आमच्या घरातल्या मुलांना परवानगी होती.. तेवढीच मला होती व शिक्षणाची, नोकरी करायची बाहेर जायची सगळी  परवानगी होती  ..संस्कारामध्ये आपल्यापेक्षा वडीलधारी जी लोक असतात त्याचा मान सन्मान करायचा आणि वेळ पडली तेव्हा एक पाऊल मागे घेतलं पाहिजे, कोणी आपल्या ज्येष्ठांच्या विरोधात गेले तर ह्याला आपले संस्कार म्हणतात का? आणि अनेक वर्ष संघटनेमध्ये आहे.. मी  जबाबदाऱ्या घेतल्या नाहीत आणि घरातले बाहेरचे काम करायचे आणि कुटुंबाचे अध्यक्ष वडील  आदरणीय पवार साहेब यांचे स्थान होतं.. आम्ही कोणाच्या कॉन्ट्रॅक्ट मधले पैसे खाल्ले नाहीये.. राजकारणात आम्ही पैसे कमवायला आलेलो नाहीत.. देशात आपल्याला बदल करायचा आहे.
पाण्याची समस्या सुटली पाहिजे, उत्तर महाराष्ट्रामध्ये दहा टीएमसी पाणी जे केंद्र सरकार आपल्याला नाकारते त्याच्यासाठी आम्ही लढा लढू आणि उत्तर महाराष्ट्र ला न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालणार..काग्रेस काळात सर्व योजना झाल्या आहेत..सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक योजना आणू,तुम्हाला मानसन्मान मिळून देऊ..
भावाकडून प्रेम हवे,पैसा नको…यांना भाऊ बहीणीचे प्रेम कळलेच नाही.अमळनेरला महाविकास आघाडीचा आमदार निवडून द्या
असे अमळनेरला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहात संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे ‘ताई आपल्या भेटीला’ या महीला मेळाव्यात बोलत होत्या.
प्रस्ताविक राष्ट्रवादी पक्षाच्या महीला उपअध्यक्षा तिलोत्तमा पाटील यांनी केले. अँड हेमा पिंपळे बीड
पवार म्हणाल्या साहेबांनी महिलांना आरक्षण दिलं..महीला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत..महीलांना ३३ टक्के नोकरीत आरक्षण दिले..नोव्हेंबर महीन्यात निवडणुका लागतील त्यावेळी अमळनेरला सगळे इच्छुक आहेत.. त्यामुळे कुणाला तरी एक जणाला तिकीट मिळेल.. पण सर्वांनी एक दिलाने काम करा असे सांगत सत्ताधारी पक्षावर टिका करत येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा असे सांगितले..
मंगलबाई पाटील जळगाव यांनी
अहिराणी भाषणात सांगितले की
कोणतयं सरकारं येऊं दया कोणतीच योजना बनं पडणार नाही, मोठ्या मोठ्या गोष्टीत पण मी एकाच सांगा .. पवार साहेबांचा तेसनी अपमान करा..लाडकी बहीण योजनाने तुम्ही समाधान होऊ.. पवार साहेब जो दिल्लीला पुढे झुकत नाही आणि त्या नेत्याने बोलले आम्हीच बोलले पाहिजे..ईडीसिबी आयना दाख धकाडा आम्ही घाबरणार नाही असे सांगितले
कमल आक्का म्हणाल्या कि
शिवाजी महाराजांच्या कार्याने पुण्य झालेली भूमी आहे तसेच क्रांतिवीर सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे सावित्रीबाई मुळे या सगळ्या महिला इथपर्यंत पोहोचल्या आहेत या सगळ्या महिलांना खूप प्रश्न असतात आपल्याला संसार चालवायचा असतो संसार चालवताना आपल्याला आपलं नियोजन करायचं असतं आपल्याला जी मिळत असते त्या मिळकतीतच आपण आपलं नियोजन करत असतो त्याच्या पलीकडे जर आपला खर्च वाढला तर आपल्याला कर्ज उचलावं लागतं तसंच आपल्या शासनाचा देखील असतो त्यांनाही लिमिटेड म्हणजे अगदी त्यांना पण मिळणारी उत्पन्न हे लिमिटमध्ये असतं त्यांना त्याच्यामध्ये सगळे महाराष्ट्र गव्हर्मेंट कुठलेही गव्हर्मेंट व त्यांना पूर्ण खर्चाचा नियोजन करावे लागत त्या पलीकडे जाऊन जर त्यांनी अतिरेक केला तर मात्र आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर अदृश्य पण कर्ज होतं आणि त्यांनी अशा कुठल्याही योजना आणल्या त्याच्यामुळे आपलं सरकार कर्जात जाऊ शकतो त्यामुळे अशा योजनांना बळी पडू नये असे सांगितले..
मनोगत
दिपाली बेहरे युवती यांनी मनोगत व्यक्त केले.वंदना चौधरी जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी महीला म्हणाल्या कि आजच्या महीला सुरक्षित आहेत का?
आम्हाला पंधराशे रूपये नको, महीलांचा सन्मान व्हावा श्रीराम पाटील
बियाणे व खतांचे भाव वाढले,जीवन आवश्यक वस्तुवर अठरा टक्के कर लावला असे सांगितले. गुलाबराव देवकर मा.पालकमंत्री असताना गिरीश महाजन यांनी कापसाठी आंदोलन केले होते.. आता शेतकरी बांधवांची काय परिस्थिती आहे हे सांगितले..
यावेळी गुलाबराव देवकर,मा.पालकमंत्री सतीश पाटील, अँड हेमा पिंपळे राज्य प्रक्ते बीड ,मंगलाबाई पाटील जळगांव,
डॉ बी.एस.पाटील,मा.आमदार दिलीपराव सोनवणे,तिलोत्तमा पाटील,उमेश पाटील,अमळनेर तालुकाध्यक्ष सचीन पाटील,इंदीराताई पाटील,ग्रंथपाल संघटनेच्या रिता बाविस्कर,रिताताई बाविस्कर, श्रीराम पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे श्याम पाटील, प्रा.अशोक पवार, डॉ अनिल शिंदे, अँड ललिता पाटील,
प्रशांत निकम,आर.बी.शिंदे,अनंत निकम,विजय पाटील, कुणाल पाटील,जयवंतराव पाटील,मनोहर पाटील,
प्रमोद पाटील, वंदना चौधरी, संजय पाटील, अनिल पाटील, दयाराम पाटील,कामराज निकम शिंदखेडा, सह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृह बंधू, भगिनीनी ओसांडून भरलेले होते..
सुत्रसंचालन साने गुरुजी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचीन पाटील,श्याम पाटील यांनी मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *