अमळनेर येथे बौद्ध समाज मंच तर्फे गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न..
![]()
अमळनेर येथे बौद्ध समाज मंच तर्फे गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न..
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथे बौद्ध समाज मंच आयोजित गुणवंतांचा सत्कार समारंभ लाॅयन्स हॉल येथे झाला. कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. याप्रसंगी मा.नगरसेवक नरेंद्र संदानशिव, बाळासाहेब योगराज संदानशिव, मा.गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्षा मंगलाताई सोनवणे, रिपब्लिकन पार्टी तालुकाध्यक्ष यशवंत बैसाणे, प्रोटान शिक्षक संघटना राज्य उपाध्यक्ष कमलाकर संदानशिव, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष दाजीबा गव्हाणे, नपा इंटकचे सोमचंद संदानशिव, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर निकम, मा.केंद्रप्रमुख विमलताई मैराळे, भिम आर्मीचे तालुकाध्यक्ष प्रविण बैसाणे, प्रा.अशोक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाजातील गुणवंत व आदर्शवत अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या सत्कारार्थी यादीत पीएचडी धारक पंधरा प्राध्यापक, नेट/सेट उत्तीर्ण झालेले चार भावी प्राध्यापक, आरोग्य सेवा देणारे पाच डॉक्टर, तीन जण शासकीय नोकरीत लागलेले, नऊ तरुण-तरुणी उद्योजक/ व्यावसायिक, शारीरिक अपंगावर मात करून स्वयंप्रकाशित झालेले तीन दिव्यांग, प्राविण्यासह शिक्षण पूर्ण केलेले पाच विद्यार्थी, राजकीय क्षेत्रात विविध पदांवर निवड झालेले दोन तरुण कार्यकर्ते, इयत्ता दहावी पासून ते पदवीपर्यंतचे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले बावीस विद्यार्थी, यासह सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा समावेश होता.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी समाजास प्रेरणादायी असणारे असे कार्यक्रम सर्व दूर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केले. येथे फक्त विद्यार्थ्यांचा नव्हे तर समाजातील सर्व गुणवंत व्यक्तिमत्त्वांचा सत्कार केला हे या कार्यक्रमाचे विशेष आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात उच्च विद्याविभूषित प्रगल्भ लोक ज्या समाजात आहे त्या समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. अशा कार्यक्रमातून समाजातील दृष्ट प्रवृत्तींना दूर ठेवण्यासाठी तसेच तरुणांना रोड रोमियोसारख्या गैरमार्गाला न जाता त्यांना पूर्ण वेळ अभ्यास करून गुणवत्ताधारक होण्याची प्रेरणा मिळते असे गोरवोदगार त्यांनी काढले.
प्रमुख अतिथींचे स्वागत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष समाधान मैराळे, सुनिल वाघ सर, सुरेश कांबळे, हृदयनाथ मोरे, प्रा.भानुदास गुलाले, सोपान भवरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद निकम, प्रास्ताविक अतुल डोळस तर आभार प्रदर्शन सुनील वाघ यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.राहुल निकम, प्रा.डॉ.भगवान भालेराव, प्रा.डॉ.हर्षवर्धन जाधव, प्रा.डॉ.चंद्रकांत नेतकर, प्रा.डाॅ.विजयकुमार तुंटे, प्रा.डॉ.विजय खैरनार, प्रा.डाॅ.विजयकुमार वाघमारे, प्रा.डॉ.विजय गाढे, प्रा.डाॅ.हर्षल नेतकर, प्रा.डाॅ.माधव भुसनार मा.केंद्रप्रमुख चिंधू वानखेडे, डॉ.सिद्धार्थ सैंदाणे, मंगरूळ विकास सोसायटीचे उपाध्यक्ष अरुण घोलप, बामसेफ तालुकाध्यक्ष दिपक बिऱ्हाडे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक सिद्धार्थ सोनवणे, समता शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार अजय भामरे, एसटी वाहतूक नियंत्रक विजय वाडेकर, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष ॲड.अभिजित बिऱ्हाडे, देवदत्त संदानशिव, मनिष उघडे, किरण चव्हाण, बापुराव ठाकरे, डी.ए.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर प्रमोद बिऱ्हाडे, पत्रकार आत्माराम अहिरे, भूपेंद्र शिरसाठ, अविनाश बिऱ्हाडे, सुनिता मोरे, अनिता संदानशिव, गौरव सोनवणे, राहुल बिऱ्हाडे यांनी परिश्रम घेतले.

