विश्व संस्कृत दिनानिमित्त के.सी.ई.सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात श्री.आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन.
![]()
विश्व संस्कृत दिनानिमित्त के.सी.ई.सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात श्री.आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन.
जळगाव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने जळगाव शहरातील शालेयस्तरीय विद्यार्थ्यांसाठी के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय श्री.नंदकुमार बेंडाळे यांच्या संकल्पनेतून श्रावण पौर्णिमेच्या शुभ दिनी सर्वत्र साजरा केल्या जाणाऱ्या विश्व संस्कृत दिनानिमित्त श्री.आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धा इ.८वी, इ.९वी, इ.१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी असून या स्पर्धेमध्ये २२ शाळांमधील ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. इ.८वीसाठी मधुराष्टकम इ.९वीसाठी पांडूरंगाष्टकम तर इ.१०वीसाठी शिवतांडव स्तोत्रांचे पठण विद्यार्थी सांघिक स्वरूपात करणार आहेत. सदर स्पर्धेकरीता प्रत्येक गटाला/वर्गाला प्रथम बक्षीस ७०१₹, द्वितीय बक्षीस ५०१₹, तृतीय बक्षीस ३०१₹,व २०१ रुपयाचे प्रत्येकी दोन उत्तेजनार्थ बक्षीसे, सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र येणार असल्याची माहिती आज महाविद्यालयाच्या न्यू कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉ.एस. एन.भारंबे यांनी उपस्थित पत्रकार बंधूंना दिली. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.करुणा सपकाळे,पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे, समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, प्रा.उमेश पाटील,संस्कृत अध्यापक प्रा.अर्जुनशास्त्री मेटे, समिती सदस्य सर्वश्री डॉ.अतुल इंगळे, प्रा.शिल्पा सरोदे,प्रा.दिनेश महाजन,प्रा.संदीप वानखेडे, प्रा.संदीप गव्हाळे,प्रा.विनोद पावरा, प्रा. गुणवंत वंजारी ,प्रा.प्रमोद भोई, प्रा.महेन्द्र राठोड,प्रा.सूर्यकांत बोईंवाड आदी उपस्थित होते. सदर स्पर्धेच्या आयोजनाकामी प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे यांच्या मार्गदर्शनात कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

