चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
![]()
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
अमळनेर प्रतिनिधी
आज दि.15/08/2024 वार-गुरुवार रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाला श्री. वाघ बाबा(मॅनेजर-बालाजी संस्थान, पारोळा),श्री. रघुनाथ माळी सर(से.नि.मुख्या.),श्री. देवेन्द्र भाऊलाल पाटील(पोलीस पाटील-वंजारी),श्री. सुरेश दयाराम महाजन(संचालक-बालाजी एजन्सी,पारोळा),संस्थेचे अध्यक्ष अण्णासो.डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर आणि विशेष विद्यार्थ्यांचे पालक आदि मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे व सरस्वती मातेचे प्रतिमापुजन करण्यात आले.ध्वजारोहण श्री.देवेन्द्र भाऊलाल पाटील(पोलीस पाटील-वंजारी) यांच्या हस्ते करण्यात आले.उपस्थित मान्यवरांच स्वागत संस्थेचे अध्यक्ष अण्णासो. डॉ.योगेश महाजन सर यांच्या हस्ते करण्यात आले.शाळेतील विशेष विद्यार्थ्यांनी आणि विशेष शिक्षकांनी देशभक्तीपर गीत व नृत्य सादर केली.श्री.वाघ बाबा व रघुनाथ माळी सर यांनी संस्थेच्या अध्यक्षांच आणि शाळेच्या मुख्याध्यापकांच ,विशेष शिक्षकांच व विशेष विद्यार्थ्यांच कौतुक केलं.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. जगदीश सोनवणे सर यांनी केले. कार्यक्रमाला सर्व कर्मचारी उपस्थित होते.

