स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत व्हि. झेड. पाटील हायस्कुल, शिरुडला रांगोळी स्पर्धा
![]()
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत
व्हि. झेड. पाटील हायस्कुल, शिरुडला
रांगोळी स्पर्धा
अमळनेर प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी शिरूड माध्यमिक विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम दरवर्षी राबवली जातात या वर्षी 15 ऑगस्ट चे औचित्य साधत वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या..
सविस्तर माहिती अशी कि शिरूड माध्यमिक विद्यालयात कला गुणांना वाव मिळण्यासाठी 15 ऑगस्ट निमित्त औचित्य साधून 5 वी. ते 10 वी लहान, मोठा गट रांगोळी स्पर्धा आयोजन करण्यात आली. स्पर्धेचे विषय पर्यावरन, 15 ऑगस्ट, मुली वाचवा असे विविध विषयांवर विद्यार्थीनि रांगोळी काढली.तसे श्रीमती. देशमुख मॅडम व श्री. व्ही. डी. सूर्यवंशी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत शाळेतील मुख्याध्यापक श्री. अनिल पाटील, व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

