१७ ऑगस्ट रोजी अमळनेर येथे सर्व धर्म परिषदेचे आयोजन
![]()
१७ ऑगस्ट रोजी अमळनेर येथे सर्व धर्म परिषदेचे आयोजन
———————————————————————
अमळनेर :- अमळनेर महिला मंच ट्रस्ट व पोलीस स्टेशन अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी बन्सीलाल पॅलेस , प्रताप मिल परिसर अमळनेर येथे दुपारी ३.३० वाजता ‘ सर्व धर्म परिषद ‘ चे आयोजन करण्यात आले आहे .
या परिषदेत प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ , साध्वीची प्रमिदिता श्री जी मसा , भिख्खू नागसेन , मकसूदभाई बोहरा , भाईसाब घनश्याम तोलानी जग्यासी , ग्रेव्ह दरबारी , मुफ्ती हरून नदवी , रेव्हरंड विशाल वळवी , वेदमूर्ती भगवतकार अमोल शुक्ल यांना आपापले विचार मांडण्या करिता निमंत्रित करण्यात आले असून समालोचक म्हणून प्रसिद्ध विधीज्ञ ऍड. सुशील अत्रे उपस्थित राहणार आहेत .
या कार्यक्रमास जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. अपर्णा मुठे , सरोज भांडारकर , कांचन शहा , वसुंधरा लांडगे तसेच अमळनेर पोलीस स्टेशन यांनी केले आहे .

