शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय शिरसोली रोड, जळगाव येथील शल्यतंत्र विभागात दुर्धर व जुनाट जखमेवर आयुर्वेद पद्धतीने यशस्वी उपचार
1 min read

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय शिरसोली रोड, जळगाव येथील शल्यतंत्र विभागात दुर्धर व जुनाट जखमेवर आयुर्वेद पद्धतीने यशस्वी उपचार

Loading

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय शिरसोली रोड, जळगाव येथील शल्यतंत्र विभागात दुर्धर व जुनाट जखमेवर आयुर्वेद पद्धतीने यशस्वी उपचार करण्यात आले आहे.
शहरातील रहिवासी निर्मला सोनी ह्यांना २०१० पासुन उजव्या पायाला वेरीकोज अल्सर (varicose ulcer) चा त्रास सुरु झाला. आधुनिक पद्धतीने उपचार
करून सुद्धा ती जखम बरी झाली नाही. त्यानंतर त्यांनी २०१४ साली पायाची सर्जरी केली. तरी त्यांना अपयश आले.
फेबुवारी २०२४ पासून त्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय शिरसोली रोड, जळगाव या ठिकाणी शल्यतंत्र विभागात उपचारार्थ दाखल झाले, या ठिकाणी महाविद्यालयातील व रुग्णालयातील शल्यतंत्र विभाग प्रमुख व प्राध्यापक डॉ.सीमा राजेश गिरी व सहाय्यक प्राध्यापक वैद्या सना शकुर शेख यांनी निर्मला सोनी यांच्यावर जलौकावचरण, धुपन चिकित्सा, व्रण रोपण
उपचार व आयुर्वेद औषध उपचार केले व त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले. रुग्णालयातील व्रणोपचारक समाधान पवार यांचे मोलाचे योगदान मिळाले.
महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता वैद्य अभिजित अहिरे व आयुष संचालक वैद्य रमन घुंगराळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
दुर्गंधीयुक्त सडलेली, पुययुक्त, काळपट पडलेली, खोल असा व्रण या उपचार पद्धतीनी पूर्णपणे बरा झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *