क्षत्रिय फुलमाळी समाजाच्या अध्यक्षपदी दिलीप पाटील, उपाध्यक्षपदी दिनेश माळी तर सचीवपदी विजय माळी यांची निवड  समाजबांधव यांच्यावतीने अभिनंदन व शुभेच्छा!!
1 min read

क्षत्रिय फुलमाळी समाजाच्या अध्यक्षपदी दिलीप पाटील, उपाध्यक्षपदी दिनेश माळी तर सचीवपदी विजय माळी यांची निवड समाजबांधव यांच्यावतीने अभिनंदन व शुभेच्छा!!

Loading

क्षत्रिय फुलमाळी समाजाच्या अध्यक्षपदी दिलीप पाटील, उपाध्यक्षपदी दिनेश माळी तर सचीवपदी विजय माळी यांची निवड

समाजबांधव यांच्यावतीने अभिनंदन व शुभेच्छा!!

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील क्षत्रिय फुल माळी समाज संस्थेची जनरल मीटिंग आयोजित करण्यात आली होती.. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप आत्माराम पाटील हे होते.. अगोदर सावतामाळी, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले..
जनरल मीटिंगमध्ये समाजाचे बांधव उपस्थित होते त्यामध्ये संस्थेचे विश्वस्त मंडळांची निवड करण्यात आली व त्यामधून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली प्रत्येकाने आपल्या परीने समाजाचा विकास कसा होईल व आपल्या संस्थेची उन्नती कशी होईल अशी मते मांडली.. त्यामध्ये सविस्तर चर्चा झाली.. सूत्रसंचालन डॉ उदय कुमार खैरनार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. एडवोकेट नागराज माळी सर यांनी केले संस्थेच्या नूतन कार्यकारणीच्या पदाधिकारी व विश्वस्तांचे खूप खूप अभिनंदन सर्व समाजबांधव यांच्या वतीने करण्यात आले.

*क्षत्रिय फुल माळी समाज नवीन कार्यकारणी जाहीर.अमळनेर (२०२४ ते २०२९)*
अध्यक्ष.श्री दिलीप आत्माराम पाटील उपाध्यक्ष.श्री दिनेश भाऊराव माळी ,सचिव.श्री विजय सखाराम माळी
सहसचिव .संजय काशिनाथ खलाणे
खजिनदार .विजय हिरालाल महाजन
विश्वस्त .श्री खेमराज रतन बोरसे
विश्वस्त .श्री कैलास अर्जुन महाजन
विश्वस्त .श्री नगराज शेनपुडू माळी.
विश्वस्त .गिरधर पंढरीनाथ पाटील
विश्वस्त .श्री प्रवीण भिला महाजन
विश्वस्त .नाना काशिनाथ पाटील
यांची निवड करण्यात आली…

चौकट
क्षत्रीय फुलमाळी समाजाच्या नुतन कार्यकारणीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची पाच वर्षासाठी आमच्यावर समाजबांधवांनी पुन्हा जबाबदारी टाकली.समाजाच्या चांगल्या कामाला नेहमीच प्राधान्य देणार व समाजाचे संघटन वाढीसाठी प्रयत्न करणार..समाजातील बांधव व भगिनीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार..

दिलीप पाटील
अध्यक्ष
दिनेश माळी
उपाध्यक्ष
क्षत्रिय फुलमाळी समाज अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *