शासकीय आदिवासी हॉस्टेल मध्ये विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा.
1 min read

शासकीय आदिवासी हॉस्टेल मध्ये विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा.

Loading

शासकीयआदिवासी हॉस्टेल मध्ये विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा.

अमळनेर

येथील चोपडा रोड अमळनेर येथील शासकीय आदिवासी वसतिगृह येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला.

याप्रसंगी समाज कार्य महाविद्यालय अमळनेर येथील प्रा विजयकुमार वाघमारे,धनदाई कॉलेज चे प्रा रमेश पावरा,आधार संस्थेचे प्रकल्प मॅनेजर दीपक संदान शिव यांनी उपस्थित विद्यार्थींना सविस्तर उदबोधन केले. या प्रसंगी वसतिगृह गृहपाल मा ए.जी.बारेला साहेब यांनी पुढाकार घेऊन प्रास्तविक केले.
सूत्र संचलन विनोद पारधी यांनी केले.याप्रसंगी सामान्य ज्ञान परीक्षा चाचणी मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

आभार प्रदर्शन रतन बेंडकोली यांनी केले
यशस्वितेसाठी लिपिक बी. डी.धनगर, मदन पाटील विदयार्थी प्रतिनिधि उत्तम पाडवी,सुहास कोकणी,यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *