ग्रंथालय संघटनेच्या पदाधिकारी रिता बाविस्कर यांचा अजीत पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला राजीनामा
1 min read

ग्रंथालय संघटनेच्या पदाधिकारी रिता बाविस्कर यांचा अजीत पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला राजीनामा

Loading

लवकरच शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश करणार-सौ रिता बाविस्कर

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
राष्ट्रवादी अजीतदादा पवार गटाच्या ग्रंथालय संघटनेच्या पदाधिकारी रिता बाविस्कर मँडम यांनी ग्रंथालय संघटनेच्या माध्यमातून मागण्या पुर्ण न झाल्यामुळे
आपल्या पदाचा राजीनामा पत्र नुकतेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या कडे सोपवला आहे.
सविस्तर माहिती अशी कि आपल्या पक्षात महाराष्ट्रातील शासनमान्य ग्रंथालयांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला होता, परंतू आपण मा.श्री. अजितदादा यांनी आमच्या ग्रंथालयांच्या महाराष्ट्रातील मागण्यांबाबत उदासिनता दाखविली व त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मी रिता बाविस्कर आपल्या पक्षाच्या सदस्यपदाचा व राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. तरी तो आपण स्विकारावा असे पत्रात नमूद केले आहे.

अजीतदादा पवार गटात ग्रंथालय संघटनेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रवेश केला होता. पण कोणत्याही प्रकारची प्रश्न सुटले नाही म्हणून मी ग्रंथालय संघटनेच्या पदाचा राजीनामा दिला. पुढे त्या म्हणाल्या कि मी लवकरच शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश करणार आहे. कारण साहेबांशी खुप जुने ऋणानुबंध आहेत असे सांगितले.

सौ रिता बाविस्कर
ग्रंथालय संघटना अध्यक्ष
ग्रंथालय संघटना महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *