अमळनेरात मंत्री ना.चंद्रकांत पाटलांना सानेगुरुजी ग्रंथालय व जळगाव जिल्हा ग्रंथालय संघटनेच्या वतीने समस्याबाबत निवेदन
![]()
अमळनेरात मंत्री ना.चंद्रकांत पाटलांना सानेगुरुजी ग्रंथालय संघटनेच्या वतीने निवेदन
अमळनेर प्रतिनिधी
मा. मंत्री उच्च तंत्रशिक्षण व महा.राज्य.दादासाहेब चंद्रकातजी पाटील हे अमळनेर येथे आले असता पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालय व जळगाव जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने दादांच्या सत्कार करण्यात आला व शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदानात वाढ , ग्रंथालय वर्ग बदल करणे , नवीन ग्रंथालयांना मान्यता देणे अशा विविध मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळेस पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे सहचिटणीस सुमित कुलकर्णी
संचालक दिपक वाल्हे ,जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह संजय पाटील ,तालुका ग्रंथालय अध्यक्ष नरेंद्र महाजन सहाय्यक ग्रंथपाल मधुकर बाळापुरे, रमेश सोनार व अमळनेर तालुक्यातील ग्रंथालय संघाचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

