अमळगाव ला महसूल पंधरवाड़ा अंतर्गत नवीन मतदार तसेच महिला मतदार नोंदणी शिबीर-कॅम्प चे आयोजन
![]()
अमळगाव ला महसूल पंधरवाड़ा अंतर्गत नवीन मतदार तसेच महिला मतदार नोंदणी शिबीर-कॅम्प चे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी
दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी अमळगाव मंडळ भागातील अमळगाव सजा येथील आदर्श हायस्कूल अमळगाव या ठिकाणी महसूल पंधरवाड़ा अंतर्गत नवीन मतदार तसेच महिला मतदार नोंदणी शिबीर-कॅम्प चे आयोजन ठीक 10 वाजता करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात सर्व मंडळ भागातील बीएलओ तसेच तलाठी यांना बोलावून घेऊन वरील शिबीरात एकूण 83 नवीन व महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे
सदर कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी पी एस पाटील अमळगाव भाग व भागातील तलाठी पराग पाटील, तलाठी स्वप्नील कुलकर्णी, तलाठी वाल्मीक पाटील, तलाठी जितेंद्र पाटील, तलाठी परवर तड़वी तसेच कोतवाल अमळगाव आणि कोतवाल दोधवद यांनी तसेच सरपंच अमळगाव आणि भागातील सर्व बीएलओ आणि मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आदर्श हायस्कूल अमळगाव यांनी परिश्रम घेतले.

