साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन
1 min read

साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

Loading

साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी शोषित,दिनदलीत समाजासाठी आपलं कार्य करून स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. तर लोकमान्य टिळक
यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” असा इंग्रजांना सडेतोड सांगणारे दोन्ही महामानवांना साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अभिवादन करण्यात आले..
अमळनेर येथील पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त उपस्तिथ जेष्ठ वाचकांचे हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करणेत आले सदर प्रसंगी वाचनालायचे अध्यक्ष श्री. दिलीप सोनवणे व चिटणीस श्री. प्रकाश वाघ कर्मचारी श्री. मधुकर बाळापुरे सहा. ग्रंथपाल श्री. रमेश सोनार लिपिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *