साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन ———!!!
![]()
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन ———!!!
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज एक ऑगस्ट 2024 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला श्री ए.पी. जाधव सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. सदर प्रसंगी मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून गायत्री प्रकाश गरुड, श्रद्धा संजय गरुड, भावेश चंद्रकांत लोहार ,गौरव उमेश लांडगे, आरुष अनिल गरुड, हेमंत संदीप मांडोळे,पायल मनोज गरुड, मानसी अनिल गरुड, शिवन्या गरुड आदी उपस्थित होते . तदनंतर शालेय विद्यार्थ्यांमधून पायल मनोज गरुड, गायत्री प्रकाश गरुड, चेतना पंकज कोळी, प्रतीक्षा नामदेव कुंभार ,रिया गणेश धनगर आणि भावेश चंद्रकांत लोहार यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटावर विविध प्रसंग कथन केले .तसेच शालेय ज्येष्ठ शिक्षक श्री डी. एस. माळी सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या विषयी लोकमान्य म्हणजे काय ? याविषयी सविस्तर विवेचन केले. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक उत्सव, सामाजिक एकात्मता, स्वातंत्र्य सेनानी, गणितात कुशाग्र, पत्रकार आणि थोर समाज सुधारक म्हणून कोणते कार्य केले ? याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली .सदर प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे उपस्थित होते. त्यांनी सदरच्या विद्यार्थ्यांना भारतीय चलनातील नवे कोरे कॉइन बक्षीस म्हणून विद्यार्थ्यांना कार्यक्रमातच देण्यात आले. आणि आपल्या मनोगतात लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त करताना ‘ छडी लागे छम छम ,विद्या येई घम घम, या म्हणीप्रमाणे ‘छडी बसली बेदम अण्णाभाऊंनी शाळा सोडली एकदम, नंतर त्यांच्या कार्यानेच वाजू लागले पडघम, दीड दिवस शाळा परिणामानेच जीवन झाले सुंदरम, जीवन झाले सुंदरम ! अण्णाभाऊ हे शाळा सोडल्यानंतर कम्युनिस्टांनी चालवलेल्या साक्षरता वर्गात जाऊन शिक्षण घेऊ लागले. आणि आपल्या प्रतिभेच्या जोरावर प्रचंड साहित्याची खाणच निर्माण केली. गायनाची आवडीमुळे कम्युनिस्ट चळवळीत गीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांनी प्रभावित होऊन 1942 च्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले, 1948 पासून कादंबऱ्यांचे लिखाण करून जवळजवळ 33 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. त्यापैकी फकीरा नावाची कादंबरी ही संपूर्ण देशभरात नावलौकिक झाली. कथा, नाटके, पोवाडे, श्लोक, चळवळीची गाणी, प्रवासवर्णन, लोकनाट्य इत्यादी साहित्य त्यांच्या लेखणीच्या प्रवाहातून तळागाळातील जन माणसांच्या जीवन प्रवाहात प्रसिद्ध झाले. लोकशाहीर आण्णाभाऊ यांनी त्यांच्या कार्यकाळात म्हटले होते की,
” ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे! इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीत झाली —–! असे परखड मत त्यांनी स्पष्ट केले होते. सदर प्रसंगी श्री वाय. जे. पाटील, व्ही .डी .पाटील तसेच एस. एस. तेले ,बी. एस .चव्हाण, ए.यू. महाजन, सी.डी. निकम, व्हीं. डी.जाधव मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक पी.एम. ठाकरे यांनी केले. कार्यक्रमानंतर श्री ए.पी .जाधव सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व शालेय विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले .चहापानानंतर कार्यक्रमाचे सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे यांनी सहकार्य केले.

