लोकमान्य विद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा
1 min read

लोकमान्य विद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

Loading

लोकमान्य विद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

अमळनेर: येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात २६ जुलै कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन तर प्रमुख विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जितेंद्र चौधरी व मनिषा खांजोडकर हे मंचावर विराजमान होते. प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी भारतामाता पूजन केले तद्नंतर विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते सादर केलीत. नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सायली देशपांडे व आभार माधुरी सोनार यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *