पिंपळी येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
1 min read

पिंपळी येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

Loading

पिंपळी येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
पिंपळी ता..अमळनेर येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात // एक पेड़ माॅ के नाम // या मोहिमेंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी माता पालकांना आमंत्रित करून प्रतिमा व रोपांचे पूजन केले गेले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विकास शेलकर सर यांनी आलेल्या मातांचे स्वागत करून आपल्या अध्यक्ष भाषणात- वृक्षांचे आपल्या जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना व पालकांना स्पष्ट केले तसेच प्रत्येक माता पालक आणि त्यांचे पाल्य यांच्या हातात रोप देऊन विद्यार्थ्यांच्या .. (मातेच्या).आईच्या शुभ हस्ते शाळेच्या आवारात रोपण करण्यात आले. लावलेल्या झाडांजवळ माता पालकांचे नाव व विद्यार्थ्यांचे नाव असलेले लहान आकाराचे फलक लावण्यात आले.
सदर झाडे ही विद्यार्थ्यांनी सांभाळून त्यांचे संगोपन करून वाढवावे असे सांगितले गेले.
विद्यालयाचे निसर्गरम्य वातावरण, विस्तीर्ण मैदान, शेकडो वाढलेली झाडे पाहून माता पालक व आलेल्या इतर पालकांनी आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिनेश सावळे सर यांनी केले तर आभार श्री दिनेश प्रेमराज चव्हाण सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर वृंद यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *