देवगांव देवळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी बनवले टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ वस्तू..  शिक्षण सप्ताह निमित्त कार्यक्रमात विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी घेतला आनंद
1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी बनवले टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ वस्तू.. शिक्षण सप्ताह निमित्त कार्यक्रमात विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी घेतला आनंद

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी बनवले टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ वस्तू..

शिक्षण सप्ताह निमित्त कार्यक्रमात विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी घेतला आनंद…
अमळनेर प्रतिनिधी-राज्यात २२ जुलै ते २८ जुलै शिक्षण सप्ताह निमित्ताने शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या पाश्वभूमीवर देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल येथे पाचव्या दिवशी उपक्रम राबविण्यात आला.
इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी
शिक्षण सप्ताहाच्या पाचव्या दिवशी भूमिकाभिनय घेण्यात आला. यात काही विद्यार्थ्यांनी विक्रेता बनून आपल्या मालाचे महत्त्व पटवून दिले.घरकामातून शिक्षण या उपक्रमात स्वच्छतेचे महत्त्व मुलांनी विशद केले.
कोडींग स्पर्धेतून विद्यार्थ्यांना समस्येवर मार्ग कसा कढावा, हे समजण्यास मदत झाली. माती कौशल्य या उपक्रमातून मातीच्या वस्तू बनवण्याचा अनुभव मिळाला.शेवटी टाकाऊ कापडांपासून टिकाऊ पिशव्या बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला.
मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी शिक्षण सप्ताह निमित्ताने मार्गदर्शन केले.मराठी शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. यावेळी शाळेचे शिक्षक आय आर महाजन ,एच.ओ माळी, एस के महाजन यांनी खेळ यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *