कारगिल विजय दिवस रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त निमित्ताने शहीद विरांना शौर्यांजली
1 min read

कारगिल विजय दिवस रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त निमित्ताने शहीद विरांना शौर्यांजली

Loading

कारगिल विजय दिवस रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त निमित्ताने शहीद विरांना शौर्यांजली

नागरी संरक्षण संघटन, आर एस पी युनिट, स्काऊट गाईड, एनएसएस, एनसीसी, पोलीस मित्र संघटन,यांनी कारगिल विजय दिनाचा आठवणी जागृत केल्या.: चंद्रकांत जोशी यांचे प्रतिपादन

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) नागरी संरक्षण संघटना व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिनाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कारगिल युद्धात देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी नागरी संरक्षण संघटना ठाणे चे क्षेत्ररक्षक श्री. बिमल नाथवानी, सहायक वाहतूक पोलीस उपायुक्त श्री.संजय साबळे,रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउन चे डॉ.किशोर अढळकर, तसेच RSP अधिकारी शिक्षक युनिट कमांडर मनिलाल शिंपी, पोलीस मित्र संघटन, ए एस जी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजय दिवस रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्म्यांना शौरांजली सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी डोंबिवलीतील सुजान प्रतिष्ठित नागरिक यांनी एकत्रितपणे डोंबिवलीतील शहीद कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारक येथे शौर्याजली अर्पण करून 25 वा कारगिल विजय दिन साजरा केला.
याप्रसंगी कारगिल युद्धाच्या स्मृती जागवत डोंबिवलीतील जेष्ठ इतिहास संकलक श्री चंद्रकांत जोशी यांनी युद्धाची पार्श्वभूमी आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सैन्यदलाने शौर्याची पराकाष्ठा करत पाकिस्तानला सपशेल नमवून मिळवलेल्या निर्विवाद विजयाचे स्मरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *